
आनंद एल. राय दिग्दर्शित 'शुभ मंगल सावधान' च्या भरघोस यशानंतर आता 'शुभ मंगल ज्यादा सावधान' या त्याच्या सिक्वलचा टिझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. अद्वितीय अशा या टीझरमध्ये ऍनिमेशनचा वापर करण्यात आला आहे.
Shubh Mangal saavdhan ki safalta ke baad, hum la rahe hain,
— Ayushmann Khurrana (@ayushmannk) May 9, 2019
Shubh Mangal Zyada Saavdhan
Hum mehnat zyada kar lengey
Aap pyar thoda zyada de dijiyega@aanandlrai @cypplofficial @hiteshkewalya @ErosNow#Valentines2020 #ShubhMangalZyadaSaavdhan #SMZS pic.twitter.com/ubYBiCEirr
विकी डोनर, आर्टिकल १५ आणि शुभ मंगल सावधान या चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर शुभ मंगल ज्यादा सावधान या चित्रपटात देखील तो झळकणार आहे. हा चित्रपट समलैंगिक संबंधावर म्हणजेच आर्टिकल ३७७ वर सारख्या गंभीर विषयवार असला तरी त्याचा अंदाज आणि कथा विनोदी शैलीत सादर करण्यात येणार आहे.
बऱ्याच
काळानंतर आयुष्मान आणि आनंद एल. राय एकत्र काम करत आहेत. येत्या ऑगस्ट
महिन्यापासून चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होईल असे सांगण्यात येत असून २०२०
मध्ये हा चित्रपट आपल्या भेटीस येणार असल्याची शक्यता आहे. आयुष्मान खुराना आणि
दिव्येंदु शर्मा हे या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार असल्याची चर्चा सध्या सुरु
आहे.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat