दिया मिर्झावर शाश्वत विकासाची जबाबदारी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-May-2019
Total Views |


आपले आरोग्य आणि समृद्धी ही पर्यावरणावर अवलंबून आहे त्यामुळे जेव्हा आपण पर्यावरणावर घाला घालणारी कृत्ये करतो तेव्हा अप्रत्यक्षपणे आपण आपल्यालाच इजा पोहोचवत आहोत हे लक्षात घेणे महत्वाचे आहे असे मत अभिनेत्री दिया मिर्झा हिने व्यक्त केले आहे. अमेरिकेने शाश्वत विकासाच्या दृष्टीने काही महत्वाची उद्दिष्टे लक्षात घेऊन एक समिती स्थापन केली असून या समितीमध्ये अभिनेत्री दिया मिर्झाच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे. हा मान मिळाल्याबद्दल दिया मिर्झाने आपले मत व्यक्त केले.
 
 

दिया मिर्झा बरोबरच आणखी १७ सदस्यांची नेमणूक या समितीमध्ये करण्यात आली आहे. देशातील जनतेमध्ये पर्यावरणाविषयी, शाश्वत विकासाविषयी जागरूकता निर्माण करणे, त्यांना योग्य ते मार्गदर्शन करणे हा उद्देश साध्य व्हावा यासाठी देशातील काही प्रभावशाली व्यक्तींचा या समितीत सहभाग असणार आहे. मग यामध्ये मनोरंजन, व्यापार, शिक्षण, क्रीडा, जगभरातील कार्यकारी संस्था अशा विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींची निवड करण्यात आली आहे. देशातील शाश्वत विकासाच्या दृष्टीने उचललेले हे अतिशय महत्वाचे पाऊल आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat

 
@@AUTHORINFO_V1@@