जम्मू काश्मिर : जम्मू काश्मिरच्या शोपिया भागात सुरक्षा दलांनी दहशतवादी इस्लामिक स्टेट जम्मू आणि काश्मिरचा (आयएसजेके) कमांडर इशफाक अहमद सोफी याला ठार केले आहे. जाकीर मुसासह इशफाक अहमद सोफी हा आयएसजेकेचा कमांडर होता. भारतीय सुरक्षा दलांच्या रडारवर अजूनही जाकीर मुसा आहे. तो पंजाबमध्ये असल्याची माहीती काही दिवसांपूर्वी गुप्तचर यंत्रणांनी दिली होती.
इशफाक अहमद सोफी जम्मू काश्मिरच्या सोपोर येथे राहणारा आहे. एका चकमकीदरम्यान त्याला ठार करण्यात यश आले. आयएसजेकेच्या या दहशतवाद्याला अब्दुल्ला भाई म्हणूनही ओळखले जात होते. त्याच्याकडून मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. त्याला ठार केल्यानंतर परिसरातील शाळा आणि महाविद्यालये बंद करण्याचे आदेश स्थानिक प्रशासनाला देण्यात आले आहेत.
आज पहाटे सोपोरच्या अमशीपोरात सुरक्षा दलांची चकमक झाली. त्यात सोफीला कंठस्नान घालण्यात यश आले आहे. सोफी आयएसजेकेचा कमांडर होता. त्याच्याकडे काश्मीरमधल्या कारवायांची जबाबदारी होती. २०१५ मध्ये तो हरकत-उल-मुजाहिदीन संघटनेसह काम करत होता. त्यानंतर तो २०१६ मध्ये तो आयएसजेकेमध्ये सामील झाला. यापूर्वी सुरक्षा दलाच्या जवानांसोबत झालेल्या चकमकीत बुरहान वाणी गँगचा शेवटचा कमांडर लतिफ टायगर मारला गेला.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat