‘हिंदुस्थान प्रकाशन संस्थेच्या परीसवेधचे प्रकाशन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Apr-2019
Total Views |

राजाभाऊ मुळे लिखित पुस्तकाचे प्रकाशन


मुंबई : सा. ‘विवेक’ आणि ‘हिंदुस्थान प्रकाशन संस्थे’तर्फे रवींद्र तथा राजाभाऊ मुळे लिखित ’परीसवेध’ या पुस्तकाचे प्रकाशन रविवार, दि. ७ एप्रिल रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृह, येरवडा, पुणे येथे सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांच्या हस्ते करण्यात आले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गेल्या ९३ वर्षांच्या वाटचालीत ज्या व्यक्तींनी सर्वस्व अर्पण करून व्यक्तिनिर्माणाच्या कार्यात स्वतःलाझोकून घेतले अशा व्यक्तींचा चरित्रात्मक वेध या पुस्तकात रवींद्र तथा राजाभाऊ मुळे यांनी या पुस्तकात घेतला आहे. ’समर्थ भारत’ या संकेतस्थळाचे उद्घाटनही यावेळी भैय्याजींच्या हस्ते झाले.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात ’विवेक समूह’ चे समन्वयक महेश पोहनेरकर यांनी राजाभाऊंच्या लेखणीतून हे पुस्तक कसे आकाराला आले त्याची माहिती दिली. लेखक म्हणून मनोगत व्यक्त करताना राजाभाऊ मुळे म्हणाले की, “मी जे लिहीत होतो ते वाचकांना आवडत आहे असे लक्षात आल्यावर मला लिखाणाचे प्रोत्साहन मिळत गेले. व्यक्तीनिर्माणाच्या कार्यात वाहून घेतलेल्या संघयोद्ध्यांची चरित्र शब्दबद्ध करण्याचे कार्य परमेश्वराने माझ्या हातून घडवले याचा मला विशेष आनंद होत आहे.” त्यानंतर ’परीसवेध’ पुस्तक आणि राजाभाऊ मुळे यांनी लिहिलेली ’विचारवेध’ ही पुस्तिका यांचे प्रकाशन भैय्याजींच्या हस्ते करण्यात आले. रवींद्र तथा राजाभाऊ मुळे यांचा पत्नी व कन्येसह यावेळी सन्मान करण्यात आला. तसेच रेखाचित्रकार प्रमोद कांबळे व राजेंद्र वहाडणे, ’दीक्षा पब्लिकेशन’चे चंद्रशेखर कुलकर्णी, ’समर्थ भारत’ संकेतस्थळ तंत्रज्ञ मंदार सहस्रबुद्धे यांचा सरकार्यवाह यांच्या हस्ते यावेळी सन्मान करण्यात आला.

यावेळी मनोगत व्यक्त करताना भैय्याजी जोशी म्हणाले की, गंगा जशी तिला येऊन मिळणार्‍या सर्व प्रवाहांना शुद्ध करते तसाच संघात येणारा प्रत्येक माणूस वैचारिकदृष्ट्या पवित्र होतो. संघाचा परीसस्पर्श सर्वांना झालेला आहे. ’परीसवेध’ हे पुस्तक संघाशी समरस होऊन समाजकार्यासाठी उभे राहिलेल्यांचे प्रतिनिधीत्व करणारे आहे.” यावेळी व्यासपीठावर ‘हिंदुस्थान प्रकाशन’ संस्थेचे अध्यक्ष रमेश पतंगे, नानाजी जाधव, रवींद्र वंजारवाड आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल सोलापूरकर यांनी केले. कार्यक्रमाची सांगता प्रज्ञा बक्षी यांनी म्हटलेल्या पसायदानाने झाली.


माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@