ब्रुनेईच्या सुलतानाचा शरिया

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Apr-2019   
Total Views |



सध्या ब्रुनेई चर्चेत आहे, तो तिथल्या सुलतानाने केलेल्या शरिया कायद्याच्या अतिरेकामुळे. शरिया कायदा काळानुरूप आहे की नाही ही गोष्ट अलहिदा. पण, या कायद्यानुसार ब्रुनेईचे जनजीवन चालले आहे.

 

'अल्लाह पेरीहलाकन सुल्तान’ म्हणजे, “देवा, सुलतानाला अल्लाचा आशीर्वाद आहे.” हे म्हणजे ‘गॉड सेव्ह द किंग’ किंवा ‘गॉड सेव्ह द क्वीन’चेच दुसरे रूप. ‘अल्लाह पेरीहलाकन सुल्तान’ ही मलेशियन भाषेमधली ब्रुनेई या देशाची राष्ट्रीय प्रार्थना. ‘गॉड सेव्ह द क्वीन’ म्हणण्याचे पारतंत्र्यातले दिवस मलेशियाला लागून असलेल्या ब्रुनेईमध्येही होते. सध्या ब्रुनेई चर्चेत आहे, तो तिथल्या सुलतानाने केलेल्या शरिया कायद्याच्या अतिरेकामुळे. शरिया कायदा काळानुरूप आहे की नाही ही गोष्ट अलहिदा. पण, या कायद्यानुसार ब्रुनेईचे जनजीवन चालले आहे. तिथे सुलतानाला शरिया कायदा आवश्यक वाटतो. त्यामुळे देशाचे नियम शरियानुसार आणि ते सर्वांना लागू. हे नियम लागू करताना देशाबाहेर दुसरेही देश आहेत. मुस्लीम धर्माशिवाय पृथ्वीतलावावर दुसरेही धर्म आहेत, याचा विचारच सुलतान करत नसावा, असे दिसते. इथे दारू पिण्यास पूर्णतः बंदी आहे. नशाबंदीचे एकवेळ समर्थन आहे. मात्र, देशात हलाला केलेल्या मांसाशिवाय दुसरे मांसमटण खाण्यास आणि विकण्यास बंदी आहे. रमजानच्या काळात मुस्लिमांचा रोजा असतो. या काळात पूर्वी या देशातली सर्वच उपाहारगृह बंद असायची. त्यामुळे परकीय व्यक्तींनाही सक्तीचा रोजा करण्याची पाळी यावी. मात्र, काही वर्षांपूर्वी नियमात थोडी शिथिलता आली. ती अशी की, रमजानच्या काळात देशातले उपाहारगृह सुरू असतील. मात्र, उपाहारगृहातले खाद्यपदार्थ, पिण्याच्या पाण्यासकट इतरही पेये विकत घेणाऱ्यांनी ते खाणेपिणे त्यांच्या वैयक्तिक स्थळी करावे. तसे भ्रूणहत्या करणाऱ्या किंवा मुस्लीम महिलेने मुस्लिमेतर व्यक्तीशी लैंगिक संबंध ठेवल्यास तिला कठोर शासन. चोरी केल्यास हात तोडणे. ईशनिंदा केल्यास देहदंड आणि समलैंगिक व्यक्तीने स्वतः कबूल केल्यास किंवा ती व्यक्ती तशी आहे, असे चार साक्षीदारांनी सांगितल्यास त्या व्यक्तीस दगडाने ठेचून मारण्यात येईल. समलैंगिकतेला दंडनीय अपराध देणारे इतरही देश आहेत. जसे सौदी अरेबिया, इराण, इराक, अफगाणिस्तान, नायजेरिया, सुदान येमेन वगैरे.

 

मुस्लीम राष्ट्रांचे एक स्वतंत्र जगच म्हणावे लागेल. तिथे जगाच्या पाठीवर काही का चालेना, आम्हाला जे पाहिजे तेच आमच्या इथे चालणार, अशी आडमुठेपणाची त्यांची वृत्ती. आजपर्यंत त्यांच्या या वृत्तीला सहसा कोणी खुलेआम आव्हान दिले नाही. अर्थात, त्यामागे मोठे कारण होते आर्थिक सुबत्ता आणि या राष्ट्रांकडे असलेले तेल आणि नैसर्गिक वायू. त्यातही अति झालेल्या गोष्टींबाबत काही पाश्चिमात्त्य राष्ट्रांनी आवाज उठवला होता. मात्र, त्यांना ‘इस्लाम खतरे में है।म्हणत दहशतवाद माजविणाऱ्या कट्टरपंथीयांच्या दहशतवादाचे बळी बनावे लागले. मात्र, असे असतानाही ब्रुनेईच्या कट्टर मानसिकतेला खुलेपणाने आव्हान दिले गेले आहे. जगभरातले साहित्यिक, कलाकार, विचारवंत यांनी आवाज उठवला आहे. कारण, ब्रुनेईच्या सुलतानाचा दुट्टपीपणा असा आहे की, त्यांच्या देशात धर्माच्या कडीकोयंड्यात जनजीवन बांधून टाकले आहे. मात्र, याच सुलतानाची जगभरात पंचतारांकित उपाहारगृहाची साखळी आहे. इथे मद्य, विनाहलाल केलेले मांस तसेच इस्लामवर्जित अनेक घटक विकले जातात किंवा त्यासाठी सवलत सुविधा दिली जाते.हॉटेल बेल एअर - अमेरिका, द बिव्हर्ली हिल्स हॉटेल- अमेरिका, द डॉरशेस्टर - लंडन ४५ पार्क लेन - लंडन, कोवोर्थ पार्क - लंडन, ले म्येरॉईज - फ्रान्स, हॉटेल प्लाझा अ‍ॅन्थोनी - लंडन, हॉटेल इडन - इटली, हॉटेल प्रिन्सिपल ऑफ दि साव्हियो - इटली पंचतारांकित उपाहारगृहाची साखळी चालवणारे चालक-मालक आहेत, ब्रुनेईचे सम्राट सुल्तान हसन बोल्किया...

 

स्वतः आधुनिकतेवर आधारित व्यवसाय करणाऱ्या ब्रुनेईच्या सुलतानाला केवळ स्वतःची सत्ता अबाधित राखण्यासाठी शरिया कानून चालवायचा आहे. हा नैतिक दुटप्पीपणा आहे. पाश्चिमात्त्य कलाकारांनी, विचारवंतांनी ब्रुनेईच्या सुलतानच्या पंचतारांकित उपाहारगृहावर बहिष्कार टाकला आहे आणि बहिष्कार टाकण्याचे लोकांना आवाहन केले आहे. त्यांचे म्हणणे आहे, या सुलतानाच्या उपाहारगृहामध्ये पैसे खर्च करणे म्हणजे ब्रुनेईमध्ये एखाद्या तृतीयपंथीयाला मारणाऱ्याचे हात बळकट करणे आहे. खरेतर ब्रुनेईचा सुलतान काय किंवा पाकिस्तान पंतप्रधान इमरान काय, या दोघांनाही संस्कारित जगातले मानवी मूल्य माहिती नसतील, असे नाही. पण, देशाच्या नागरिकांनी कायम धर्माच्या नावावर अधर्माचे गुलाम व्हावे, असे त्यांना वाटते. त्यामुळेच या लोकांच्या राज्यात एखाद्याच्या शरीर भिन्नतेवरून त्या व्यक्तीस मरण्याशिवाय पर्याय नसतो. दुर्दैवी आणि संतापजनक.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@