तक्रार निवारण न झाल्यास बॅंक देणार भरपाई !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Apr-2019
Total Views |


मुंबई : रिझर्व्ह बॅंकेने सर्वसामान्यांना दिलासा देणारा निर्णय गुरुवारी जाहीर केला आहे, त्यानुसार आता बॅंकांना ग्राहकांच्या अडचणी दूर करण्यास दिरंगाई केल्यास मोबदला द्यावा लागणार आहे. यामुळे बॅंकांना आता ग्राहकांच्या देयकांसंबंधीतील तक्रारी दिलेल्या वेळेत पूर्ण न केल्यास ग्राहकांना त्याबदल्यात भरपाई द्यावी लागणार आहे.

 


रिझर्व्ह बॅंकेने ग्राहकांच्या तक्रारींसंदर्भात जूनअखेरपर्यंत त्याबद्दलचे एक धोरण ठरवण्याबद्दल प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. त्यानुसार रिझर्व्ह बॅंक जून २०१९ पर्यंत भरपाई यंत्रणेबद्दलचा आकृतीबंध सादर करणार आहे. आरबीआयद्वारे बॅंकांमध्ये ग्राहक तक्रार निवारइण प्रणाली लागू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार ग्राहकांच्या तक्रारी उशिरा निवारण झाल्यास भरपाई देण्यात येणार आहे.

 

बॅंकींगस्तरावर सध्या ग्राहकांच्या विविध तक्रारनिवारणासाठी लागणारा कालावधी भिन्न आहे. इलेक्ट्रोनिक पेमेंट सिस्टमनुसार ग्राहकांना भरपाई देण्यासाठी एका यंत्रणेची गरज असल्याचे मत त्यांनी आरबीआयने व्यक्त केले. मे महिन्याच्या अखेरपर्यंत आरबीआयतर्फे पेमेंट सिस्टीमसाठी प्रमाण निश्चितीचा अहवालही सादर केला जाणार आहे. डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहान देण्यासाठी प्रयत्न करण्याचे गरज असल्याचे मत रिझर्व्ह बॅंकेने व्यक्त केले आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा...facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@