नाशिक आणि दिंडोरी - १७ %आणि २१ % मतदान

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Apr-2019
Total Views |


 

नाशिक : आज सकाळपासून देशभरात चौथ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली. सगळीकडे मतदानाचा उत्साह असतानाच आज महाराष्ट्रातील मतदानाचा आजचा शेवटचा टप्पा आहे. नाशिक आणि दिंडोरी येथेही मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. नाशिकमध्ये आत्तापर्यंत ८९,३१३९ महिला, ९८,८८९२ पुरुष म्हणजेच एकूण १८,८२,0३१ लोक मतदान करणे अपेक्षित आहे त्यापैकी ९ वाजेपर्यंत आलेल्या आकडेवारीनुसार नाशिकमध्ये १०% तर दिंडोरी मतदार संघात ७.२८ % इतके मतदान झाले आहे. तर ११ वाजेपर्यंत नाशिकमध्ये १७ % आणि दिंडोरीमध्ये २१ % मतदानाची नोंद झाली आहे.

सामान्य नागरिक तापमानाचा पार चढत असताना देखील लोकशाहीच्या या उत्सवात सामील होताना दिसत आहेत. त्याचबरोबरच नाशिकमध्ये काही दिग्गज व्यक्तींपैकी छगन भुजबळ
, विश्वास नांगरे पाटील यांनी आज मतदान केले असून सध्या प्रसारित होणाऱ्या 'हे मन बावरे' या मालिकेतील कलाकार मृणाल दुसानिस हिने तर मुंबईतील आपल्या शूटमधून वेळ काढून खास मतदानासाठी नाशिकला येऊन आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. "सर्वांनी मतदान करणे हे आवश्यक आहे, त्यामुळे मतदानाचा हक्क बजावून योग्य सरकार निवडून देणे ही आपली जबाबदारी आहे" असे म्हणत तिने सर्व नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे.

एकीकडे सर्वत्र मतदानाचा उत्साह आहे तर दिंडोरी मधील शिरसगाव
, लौंद, वडदगाव या गावातील ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकला आहे. ग्रामपंचायत विभाजनाची मागणी पूर्ण झाल्याशिवाय मतदान करणार नाही अशी भूमिका घेण्यात आली आहे.

आत्तापर्यंत ७५१ नागरिकांनी पोस्टल मतदान केले असून २३ मे रोजी ७ वाजून ५९ मिनिटांपर्यंत नागरिक पोस्टल मतदानाचा वापर करू शकतात. सामान्य नागरिकांबरोबरच ७
,३१९ सैनिकी मतदारांना ऑनलाईन सिस्टम (ETPBS) मतपत्रिका पाठवण्यात आल्या असून त्यांना देखील २३ मे पर्यंत म्हणजेच मतमोजणी होण्याआधी आपले मत पाठवण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat

 
 
 
@@AUTHORINFO_V1@@