नंदुरबारमध्ये ३ वाजेपर्यंत ५१ टक्के, तर धुळ्यात सरासरी ४० टक्के मतदान

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Apr-2019
Total Views |


धुळे : 
देशभरात लोकशाहीचा उत्सव सुरू असताना ग्रामीण भागात देखील मतदान जोरात सुरू आहे. देशभरात लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात आज नऊ राज्यातल्या ७२ जागां
साठी मतदान होत आहे. या चौथ्या टप्प्यात देशभरातल्या ७२ मतदार संघात दुपारी ३ वाजेपर्यंत सरासरी ४०.३ % मतदान झाले. 


यामध्ये धुळे मतदार संघातून भाजपतर्फे केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे आणि त्यांच्याविरुद्ध काँग्रेसचे कुणाल पाटील निवडणूक लढवत आहेत. तर भाजपचे आमदार अनिल गोटे अपक्ष उमेदवार म्हणून उभे राहिल्यामुळे ही चुरशीची लढत होणार आहे.

यामध्ये धुळे आणि नंदुरबार मतदारसंघात दुपारी ३ वाजेपर्यंत अनुक्रमे ४०.६३ % आणि ५१.९६ % मतदान करण्यात आले. नंदुरबारमध्ये सध्या तरी सर्वाधिक मतदानाची नोंद झाली असून त्या खालोखाल पालघर आणि दिंडोरी मतदार संघात मतदान करण्यात झाले आहे. नंदुरबार लोकसभा मतदार संघातून सध्या ११ मतदारसंघ असून त्यामध्ये नंदुरबार जिल्ह्यातील ४ तर धुळे जिल्ह्यातील २ असे एकूण ६ मतदारसंघ समाविष्ट आहेत. नंदुरबार मतदारसंघात एकूण १८ लाख ७० हजार ११७ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat

 
@@AUTHORINFO_V1@@