झारखंडमध्ये मतदानाला संथ सुरुवात

    29-Apr-2019
Total Views |


 


नवी दिल्ली : लोकसभा निवडणूक २०१९च्या चौथ्या टप्प्यात झारखंडमध्ये ३ जागांसाठी मतदान होत आहे. पलामू, चतरा आणि लोहरदगा या जागांवर सकाळी ७ ते ४ वाजेपर्यंत मतदान केले जाईल. या ३ जागांवर ५९ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद होणार आहे.

 
चतरामध्ये भाजपचे सुनील सिंह, काँग्रेसचे मनोज यादव आणि राष्ट्रीय जनता दलाचे सुभाष यादव यांच्यामध्ये लढत आहे. तर, लोहरदगामध्ये भाजपचे केंद्रीय मंत्री सुदर्शन भगत आणि काँग्रेसचे पूर्व प्रदेशाध्यक्ष सुखदेव भगत यांच्यामध्ये लढत आहे. तसेच दुसरीकडे, पलामूमध्ये भाजपचे बिडी राम आणि राष्ट्रीय जनता दलाचे घूरन राम हे आमने सामने आहेत.
 

तिन्ही जागांसाठी एकूण ६,०७२ मतदान केंद्रांमध्ये मतदान प्रक्रिया पार पाडली जाणार. येथे ४५ लाख २६ हजार ६९३ मतदार मतदान करणार आहेत. नक्षलग्रस्त भाग असल्यामुळे सुरक्षा रक्षकही तैनात करण्यात आले आहेत. झारखंडच्या पलामू मतदार संघातील जगोडीह या माओवाद्यांचा प्रभाव असलेल्या भागात प्रथमच मतदान चालू आहे.

 

सकाळी ११पर्यंत किती झाले मतदान?

 

सकाळी ७ वाजल्यापासून ११ वाजेपर्यंत झारखंड राज्यात एकूण २९.२१ % मतदान झाले

 

> चतरा २९.१२ %

> लोहरदगा २८.७८ %

> पलामू २९.५७ %

> सकाळी ९ वाजेपर्यंत फक्त १२ % मतदान झाले होते. हळूहळू आकडेवारीत वाढ होईल अशी शा आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat