मावळ व शिरूरमध्ये तीन वाजेपर्यंत ४० टक्के मतदान

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Apr-2019
Total Views |



पुणे : मावळ आणि शिरूर मतदारसंघात सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. मतदान करण्यासाठी नागरिकांमध्ये उत्साह दिसून येत असून सकाळी सात वाजल्यापासून दुपारी एक वाजेपर्यंत मावळमध्ये ४०.३० टक्के तर शिरूरमध्ये ४०.३५ टक्के मतदान झाले आहे. मावळ मतदारसंघातून कर्जत विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक ४४.६० तर शिरूरमधून आंबेगाव विधानसभा मतदारसंघात ४६.५३ टक्के मतदानाची नोंद झाली.

 

मावळमध्ये शिवसेनेचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे व अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्यात मुख्य लढत होत असून शिरूरमध्ये विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव पाटील व अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांच्यात मुख्य लढत होणार आहे. या दोन्हीही मतदारसंघातील निवडणुका राष्ट्रवादी व शिवसेनेने प्रतिष्ठेची केली आहे.

 

मावळ मतदारसंघातील पनवेलमध्ये ४०.९० टक्के, कर्जतमध्ये ४४.६० टक्के, उरण ४२.५१ टक्के, मावळ ४१.७० टक्के, चिंचवडमध्ये ४१.३४ टक्के व पिंपरीमध्ये ३७.८१ मतदान झाले तर शिरूर लोकसभा मतदारसंघ जुन्नरमध्ये ४३.४८ टक्के, आंबेगावमध्ये ४६.५३ टक्के, खेडमध्ये ४२.९० टक्के, शिरूरमध्ये ४१.८३ टक्के, भोसरीमध्ये ४१.३३ टक्के, व हडपसर ३१.२५ टक्के मतदान झाले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@