बलात्काराच्या आरोपात नारायण साई दोषी!

    26-Apr-2019
Total Views | 43



दोन सख्ख्या बहिणींवर बलात्कार केल्याचा होता आरोप


गांधीनगर : आसाराम बापूचा मुलगा व बलात्काराच्या आरोपाखाली शिक्षा भोगत असलेला नारायण साईवर आरोप सिद्ध झाले आहेत. सुरत सत्र न्यायालयाने नारायण साईला जहांगीरपूरा आश्रमातील साधिकेवर बलात्कार प्रकरणी दोषी ठरवले आहे. नारायणचा सहकारी गंगा, जमुना आणि हनुमान यांनादेखील याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले आहे. स्वतःला कृष्णाचा अवतार सांगणाऱ्या नारायणाच्या शिक्षेची सुनावणी येत्या ३० एप्रिल रोजी होणार आहे.

 

सुरत येथे राहणाऱ्या दोन सख्ख्या बहिणींवर बलात्कार केल्याचा आरोप नारायणवर आहे. नारायणने सुरत येथील जहांगीरपूरा आश्रमात यातील एका साधिकेवर २००२ साली बलात्कार केला होता. यानंतर २००४ पर्यंत नारायण या साधिकेचा सातत्याने लैंगिक छळ करत होता. या प्रकरणात गंगा, जमुना आणि हनुमानने नारायणला साथ दिली होती. या प्रकरणी ६ ऑक्टोबर २०१३ रोजी साधिकेने नारायणसह सात जणांविरोधात गुन्हा दाखल केला होता.

 

गुन्हा दाखल झाल्यानंतर ४ डिसेंबर २०१३ साली नारायणाला हरियाणाच्या कुरुक्षेत्र येथून अटक करण्यात आली होती. कोर्टाने नारायणाच्या विरोधात ५३ साक्षीदारांचे जबाब नोंदवले होते. अखेर पाच वर्षानंतर नारायणावर आरोप सिद्ध झाले आहेत. दरम्यान, जेलमध्ये असताना पोलीस कर्मचाऱ्याला लाच देण्याचे आरोपही ठेवण्यात आले आहेत.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121