काँग्रेसला मोठा धक्का; विखे पाटीलांनी दिला विरोधीपक्ष नेते पदाचा राजीनामा

    25-Apr-2019
Total Views | 129



अहमदनगर : मागील अनेक दिवसांपासून चालू असलेल्या काँग्रेसच्या अंतर्गत गटबाजीचा काँग्रेसला आज मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे नेते व विधानसभेचे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. विखेंचा हा राजीनामा काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी स्वीकारला असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी शिर्डी येथे बोलताना सांगितले.

 

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राधाकृष्ण विखे पाटील यांचा मुलगा डॉ. सुजय विखेंनी भाजपात प्रवेश केल्यानंतर काँग्रेसच्या अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली होती. विखे पाटील यांची अहमदनगर जिल्ह्यात मोठी राजकीय ताकद आहे. जिल्ह्यात त्यांच्याच पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात हे विखेंचे राजकीय विरोधक मानले जातात. याच संधीचा फायदा घेत थोरातांनी विखेंविरोधात दंड थोपटले होते. यावरून विखे-थोरात वाद पुन्हा उफाळून आला होता. यानंतर विखे हे भाजपात प्रवेश करणार असल्याच्या अनेक चर्चा रंगवण्यात आल्या होत्या. अखेर विखेने आपल्याला विरोधी पक्षाचा राजीनामा देत काँग्रेसच्या अंतर्गत गटबाजी नाट्याचा शेवट केला आहे.

 

विखे पाटील यांनी आपली राजकीय भूमिका येत्या दोन दिवसात स्पष्ट करू अशी माहिती बुधवारी दिली होती. यावेळी त्यांनी आपल्या समर्थकांची बैठक बोलावली होती. तर आज विखे पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेना भाजप कार्यकर्त्यांची शिर्डीत बैठक झाली. या बैठकीनंतर विखे गटाचे समर्थक मानले जाणारे अहमदनगर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष करण ससाणे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. ससाणे यांचा राजीनामा काँग्रेस व थोरात गटासाठी पहिला धक्का होता. यानंतर औरंगाबाद येथे काँग्रेसला दुसरा धक्का बसला. आमदार अब्दुल सत्तार यांचा मुलगा अब्दुल समीर अब्दुल सत्तार यांनेही औरंगाबाद ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. तर तिसरा धक्का विखे पाटील यांनी दिला.

 

शिर्डी लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांच्या प्रचार्थ काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांची शुक्रवारी संगमनेर येथे सभा होणार आहे. राहुल यांच्या सभेपूर्वीच काँग्रेसला हे तीन मोठे धक्के बसले आहेत. त्यामुळे आता महाराष्ट्रातील लोकसभेच्या अखेरच्या टप्प्यात काँग्रेसवर यांचा कसा परिणाम होतो हे पाहावे लागेल.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

अग्रलेख
जरुर वाचा
ऊर्जासंपन्न महाराष्ट्रासाठी : पर्यावरणपूरक वीजनिर्मितीचे व्हिजन!

ऊर्जासंपन्न महाराष्ट्रासाठी : पर्यावरणपूरक वीजनिर्मितीचे व्हिजन!

महाराष्ट्र हे वीजनिर्मितीत भारतातील सर्वांत आघाडीचे राज्य. देशात निर्माण होणार्या एकूण विजेच्या १५ टक्के विद्युतनिर्मिती ही एकट्या महाराष्ट्रात होते. परंतु, तरीही मागणीचे प्रमाण हे वीजनिर्मितीपेक्षा जास्त असल्याने आज राज्य सरकार नवीकरणीय ऊर्जानिर्मितीवर भर देत आहे. अशातच नुकतीच राज्य सरकारने मोठी वीजदरकपात जाहीर केली. ज्यामुळे आता पुढील पाच वर्षे वीजबिल वाढणार नाही, तर कमी होणार आहे. तेव्हा राज्यातील वीज ग्राहकांना नेमका हा लाभ कसा मिळणार, यासंबंधी महाराष्ट्र राज्य वीज सूत्रधार कंपनीचे स्वतंत्र संचालक ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121