मारूति सुझूकी 'डिझेल' कार विकणार नाही !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Apr-2019
Total Views |


नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी कार विक्री करणारी कंपनी मारूति सुझूकीने आता डिझेल कारची विक्री बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. १ एप्रिल २०२० पासून मारूति सुझूकीच्या एकही डिझेल कारची खरेदी करता येणार नाही. देशभरातील डिझेल कारच्या २३ टक्के हिस्सा मारूति सुझुकीकडे आहे. कंपनीची सर्वाधिक विक्री डिझेल कारचीच होते.

 

डिझेल कारपैकी भारतात एस-क्रॉस, सियाझ, विटारा ब्रेझा, डिझायर, बलेनो, स्वीफ्टसह अन्य इंजिनांची निर्मिती केली जाते. पुढील वर्षांपासून भारतात बीएस-सहा उत्सर्जन नियमावली लागू होणार आहे. त्यासह डिझेल कारबद्दलही कठोर नवी नियमावली आणली जाणार आहे. त्यापार्श्वभूमीवर मारूतिने हा निर्णय घेतला आहे. डिझेल कारसंदर्भात केंद्र सरकारच्या नवी नियमावलीनुसार आता सर्व डिझेल कार अद्यावत करण्याची जबाबदारी कंपन्यांची असणार आहे. त्यासाठी कंपन्यांना अधिक गुंतवणूकीची गरज लागते.

 

नव्या नियमावलीनुसार डिझेल कारची किंमत ही एक ते दीड लाखांपर्यंत वाढू शकते. त्यामुळे डिझेल कारच्या विक्रीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. या धर्तीवर मारूतिने या डिझेल कारची निर्मिती बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, या संदर्भात कंपनीने अजूनही ठोस निर्णय घेतलेला नाही. त्यावेळी ग्राहकांच्या मागणीवर पुढील धोरण अवलंबून असेल, अशी भूमिका कंपनीने घेतली आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@