'स्पॉटलाइट' - व्हिडिओ ऑन डिमांड चॅनल लाँच

    24-Apr-2019
Total Views |


 

आर्म एअरटेल डिजिटल टीव्हीने आणि झी एंटरटेनमेंट एंटरप्रायझेस लिमिटेडच्या थियेटर विभागाने आज 'स्पॉटलाइट' - व्हिडिओ ऑन डिमांड चॅनल लाँच केले जे देशभरात लोकप्रिय थिएटर ग्रुप्समधील सर्वोत्तम भारतीय नाटकांचे प्रसारण करेल.

 

त्या शिवाय एअरटेलचे डिजिटल टीव्ही माध्यम आपल्या ग्राहकांसाठी भारतातील थिएटरमध्ये मोठ्या प्रमाणात बाजारपेठ उपलब्ध करुन देईल ज्यामुळे ग्राहकांना त्यांच्या आवडीची नाटके घरबसल्या पाहावयास मिळतील.

 

प्रेक्षक विविध प्रकारच्या भाषेतील नाटक जसे हिंदी, मराठी, गुजराती, बंगाली आणि इंग्रजीमध्ये १०० पेक्षा जास्त नाटक टीवी स्क्रीनवर पाहू शकतील, जे क्लासिकल पासून थ्रिलर व विनोदी असतील. तसेच अभिनेता वरुण बडोला, सोनाली कुलकर्णी, ईरा दुबे व विक्रम गोखले हयांची प्रसिद्ध नाटक जशी चॉकार बाली, मा रिटायर होती है, वास्तव, शकुबाई आणि जनपथ किस सारखी लोकप्रिय नाटक या नवीन चॅनेलवर ग्राहकांना पाहावयास मिळतील.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat