
नवी दिल्ली : नेपाळची राजधानी काठमांडूमध्ये बुधवारी एका मागोमाग एक सलग तीनवेळा भूकंपाचे धक्के बसले. पहिला धक्का हा सकाळी ६ वाजून १५ मिनिटांनी बसला. त्याची तीव्रता ४.८ रिश्टर स्केल एवढी होती. त्यानंतर दुसरा धक्का हा ६ वाजून २९ मिनिटांनी बसला. त्याची तीव्रता ५.२ रिश्टर स्केल एवढी होती. तिसरा धक्का हा ६ वाजून ४० मिनिटांनी बसला असून ४.३ रिश्टर स्केल एवढा होता.
पूर्ण काठमांडू भूकंपाने हादरले असले तरी कोणतीही जीवीतहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. भारताच्या अरुणाचल प्रदेशच्या उत्तर-पूर्व राज्यात रात्री उशीरा १ वाजून ४५ मिनिटांनी ६.१ रिश्टर स्केल भूकंपाची तीव्रता नोंदवली गेली.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat