यंदा निवडणूकीत पर्यावरण जाहीरनामा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Apr-2019
Total Views |


सर्व उमेदवारांकडून करून घेणार कबुलीजबाब


 
नाशिक : नाशिक शहर व जिल्ह्याचे पर्यावरण अबाधित राहावे यासाठी शहर व जिल्ह्यात कार्य करणार्‍या विविध सामाजिक संस्था-संघटना यांच्यामार्फत जिल्ह्यातील लोकसभा उमेदवारांसाठी खास जाहीरनामा तयार करण्यात आला आहे. या जाहीरनाम्यात असणार्‍या मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन सर्वच उमेदवारांकडून घेण्यात येणार आहे.

 

 

हा पर्यावरण जाहीरनामा नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदार संघातील उमेदवारांसाठी तयार करण्यात आला आहे. त्यानुसार नाशिक लोकसभा मतदार संघातील शिवसेना उमेदवार हेमंत गोडसे, राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार समीर भुजबळ, वंचित आघाडीचे उमेदवार पवन पवार आणि अपक्ष उमेदवार माणिकराव कोकाटे या चारही प्रमुख उमेदवारांना हा जाहीरनामा प्रत्यक्ष भेटून देण्यात येणार आहे. तसेच यावेळी या चारही उमेदवारांकडून जाहीरनाम्यातील मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन घेतले जाणार असून आणि या मागण्या पूर्ण करण्याकरिता जो कोणी उमेदवार निवडून येईल त्याच्याकडे पाठपुरावा केला जाणार आहे.

 

नाशिक शहराचे अलीकडच्या काही काळात प्रदूषणाचे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यातच गोदावरी नदीसह नंदिनी, वाघाडी व वालदेवी या उपनद्यांची प्रदूषणामुळेदेखील दुरवस्था झाली आहे. या सर्व बाबी लक्षात घेऊन शहराला आणि जिल्ह्याला आणि शहर व जिल्ह्यातील नद्यांना पुनर्वैभव प्राप्त करून देण्यासाठी शहरातील पर्यावरणप्रेमींकडून विविध मागण्या, आंदोलन, जनहित याचिका यांच्या माध्यमातून लढा दिला जात असतो. त्याचाच एक भाग म्हणून आता शहरातील सर्व पर्यावरणप्रेमी संस्था एकवटल्या आहेत. शहरात पर्यावरणप्रेमींच्या जागरूकतेमुळे प्रशासनामार्फतदेखील विविध उपाययोजना केल्या जात आहेत. शहरातील सोळा-सतरा संस्था-संघटना कार्यरत असून त्यांच्याकडून पर्यावरण समतोलाचे काम सुरू आहे. याच संघटनांच्या प्रतिनिधींनी एकत्र येत लोकसभा निवडणुकीच्या पाश्वर्र्भूमीवर नाशिक लोकसभेच्या उमेदवारांसाठी पर्यावरण जाहीरनामा तयार केला आहे.



हा जाहीरनामा तयार करणार्‍या संघटनांच्या प्रतिनिधींमध्ये निशिकांत पगारे (गोदावरी गटारीकरण विरोधी मंच), जगबीर सिंग (मानव उथांन मंच), प्रा. सोमनाथ मुठाळ (निसर्ग विज्ञान लोकमाध्यम सामाजिक संस्था), शेखर गायकवाड (आपलं पर्यावरण संस्था), भारती जाधव (प्राणी मित्र संघटना), शरण्या शेट्टी (शरण प्राणीमित्र संघटना), सुनंदा जाधव, राम खुर्दळ (शिवकार्य गडकोट संवर्धन संस्था) चंद्रकिरण सोनावणे, रमेश अय्यर (गिव्ह सामाजिक संस्था), नितीन शुक्ला, योगेश बर्वे (कपिला नदी बचाव समिती), सुनील परदेशी (सक्षम सोशल फाऊंडेशन), अमित कुलकर्णी (निसर्गसेवक युवा मंच) विनोद संसारे आदी पर्यावरणप्रेमींचा सहभाग आहे.
 
 
या आहेत जाहीरनाम्यातील प्रमुख मागण्या
 

· गोदावरी व उपनद्या प्रदूषण, अतिक्रमण व काँक्रीटमुक्त व्हाव्यात.

· शहरातील नैसर्गिक विहिरी व जलस्त्रोताचे संवर्धन पुनर्भरण व्हावेत.

· विंधण विहिरी खोलीकरणास मर्यादा घालावी.

· रेनवॉटर हार्वेस्टिंगची कठोर अंमलबजावणी करावी.

· नवीन वसाहतीत सेप्टिक टँक कायद्याची अंमलबजावणी करावी.

· वृक्षारोपणानंतर त्यांचे जतन संगोपन करून ऑक्सिजन बँक तयार करणे व दरवर्षी ऑडिट करणे.

· डोंगरालगत खनिजांचा उपसा बंद करावा.

· वणवामुक्त डोंगर अभियान राबवावे.

· डोंगरावरील अतिक्रमण थांबवावे. गडकिल्ल्यांचे संवर्धन व संगोपन व्हावे.

· सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत सीएनजीचा वापर व्हावा.

· वायू गुणवत्ता निर्देशांक आता १२० असून तो कमीत कमी ५० असावा.

· पालापाचोळ्यापासून यंत्राच्या माध्यमातून वस्तू तयार कराव्यात.

· औद्योगिक क्षेत्रात एअर मॉनिटरिंग सिस्टिम सुरू करावी.

· प्राणी क्रूरता संरक्षण समितीची त्वरित अंमलबजावणी करावी व प्राण्यांसाठी अ‍ॅम्ब्युलन्स व्यवस्था करावी.

· प्लास्टिक व प्लास्टिक पिशव्यांच्या बंदीची प्रभावी अंमलबजावणी करावी.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@