अजित दादांची दादागिरी; शिवतारेंना दिले आव्हान

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Apr-2019
Total Views |



बारामती : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याच्या प्रचाराच्या तोफा थंडावत असतानाच रविवारी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात उडी घेत विजय शिवतारे यांना जाहीर आव्हान दिले. बारामतीत येऊन पवारांवर टीका करणारे विजय शिवतारे २०१९ ला आमदार कसे होतात तेच मी बघतो,” अशी दादागिरीची भाषा अजित पवारांनी रविवारी बारामतीत वापरली. सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराच्या सांगता सभेमध्ये बोलताना अजित पवार यांनी विजय शिवतारे यांना लक्ष्य करत त्यांच्यावर तोफ डागली.

 

बारामतीत येऊन पवारांनी काय केले, असे विचारणाऱ्या विजय शिवतारे यांना २०१९च्या विधानसभा निवडणुकीमध्ये आमदार होऊ देणार नाही, असा इशाराच यावेळी अजित पवार यांनी दिला. यावेळी ते म्हणाले की, “एकदा अजित पवार यांनी ठरवले, तर अजित पवार कोणाच्या बापाचे ऐकत नाही, हे सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे. त्यामुळे हे महाशय विधानसभेत कसे जातात हेच मी बघतो असे म्हणत शिवतारे पुन्हा मंत्री होणार नाहीत,” असेही पवार यांनी सांगितले.

 

पवारांनी काय केले, असे दोन दिवसांपूर्वी भाजप पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी बारामतीत येऊन विचारले होते. त्यावेळी तशाच अर्थाचा प्रश्न शिवसेनेच्या मंत्री विजय शिवतारे यांनी विचारला होता. पण अजित पवार यांनी रविवारी फक्त शिवतारे यांना निर्वाणीचा इशारा दिला. परंतु, अमित शहांच्या सवालावर चुप्पी साधली. अजित पवार यांनी नेहमीप्रमाणे तुलनेने छोट्या नेत्यावर निशाणा साधला. स्थानिक नेते शिवतारे यांच्यावर राग काढणाऱ्या अजित पवारांनी अमित शहा यांच्या विधानावर काहीच वक्तव्य केले नाही, याचीच चर्चा पुणे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात रंगली होती.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@