‘पगडीवाल्या’ मुख्यमंत्र्यांनीच मराठा समाजाला आरक्षण दिले!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Apr-2019
Total Views |



 


पाथर्डी :मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ‘पगडीवाले’ म्हणून हिणवणार्‍या शरद पवारांनी मराठा समाजाला आरक्षण दिले नाही. मात्र, तेच काम ‘पगडीवाल्या’ मुख्यमंत्र्यांनी करून दाखवले. शरद पवारांनी केवळ जातीजातीत विष कालवण्याचेच काम केले,” असा आरोप भाजप नेत्या व महिला, बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांनी केला. अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे-पाटील यांच्या प्रचारासाठी मंत्री मुंडे यांची शनिवारी रात्री उशिरा पाथर्डीत सभा झाली. त्यावेळी त्या बोलत होत्या.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर शरद पवार कुटुंबाच्या मुद्द्यावरून आरोप करतात. मात्र, पवार यांनीच राज्यात अनेकांची कुटुंबे फोडण्याचे उद्योग आनंदाने केले, अशी टीका पंकजा मुंडे यांनी यावेळी पवारांवर केली. “मोदी यांना पवारांसारखी मुलगी, पुतण्या यांना नाही, तर सर्वसामान्यांना उमेदवारी द्यायची आहे. त्यामुळे निवडणुकीत नात्यागोत्याला थारा देऊ नका. नाते प्रत्येकालाच असते. मलाही भाऊ आहे पण, तो मलाच संपवायला निघाला आहे. गोपीनाथ मुंडे यांची विचारधारा जपणारा कधीच संपत नसतो. मी जर मुंडे यांच्या विचारांपासून दूर गेले, तर जनता मला थारा देणार नाही. आपला भाऊ कधीमधी मी गोपीनाथ मुंडे यांच्यामुळेच आहे, असे सांगतो, तर कधी मुंडे यांनीच मला मोठे होऊ दिले नाही असेही म्हणतो. त्याला नेमके काय म्हणायचे, हे एकदा त्याने ठरवून घ्यायला हवे. वारसा केवळ मुलगाच चालवतो, असे काही नसते. मुलीसुद्धा सक्षमपणे वारसा चालवतात,” असेही त्या म्हणाल्या. यावेळी उमेदवार सुजय विखे यांच्यासह आ. मोनिका राजळे, पाथर्डीचे नगराध्यक्ष डॉ. मृत्युंजय गर्जे, शेवगावच्या नगराध्यक्ष राणी मोहिते, राहुल राजळे उपस्थित होते.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat


@@AUTHORINFO_V1@@