काँग्रेस नेत्यांनीच सांगली काँग्रेसमुक्त केली!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Apr-2019
Total Views |



सांगली :आम्ही नेहमी काँग्रेसी विचारांपासून देशाला मुक्त करण्याचा निर्धार करीत होतो. मात्र, सांगलीतील काँग्रेस नेत्यांनी एकमेकांची जिरवाजिरवी करण्याच्या नादात पक्षाची जिरवून हा जिल्हा काँग्रेसमुक्त केला,” अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी सांगलीतील प्रचारसभेत केली. भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार संजयकाका पाटील यांच्या प्रचारार्थ येथील स्टेशन चौकात रविवारी सभा पार पडली.

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “सांगली ही वसंतदादांची भूमी आहे. याठिकाणी काँग्रेसने स्वत:च्या चिन्हावर लढण्याची आवश्यकता असताना आता वसंतदादांचे नातू स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या उसन्या तिकिटावर लढत आहेत. उमेदवारी देताना एकमेकांची जिरवाजिरवी करण्याच्या प्रयत्नात काँग्रेस नेत्यांनी पक्षाचीच जिरविली. स्वाभिमानी म्हणणाऱ्यांचा स्वाभिमान आता शिल्लक तरी आहे का? शरद पवारांच्या विरोधात शेट्टी यांनी माझ्याकडे अनेक तक्रारी केल्या होत्या. अनेक कारखान्यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली होती. आता ते अशाच भ्रष्टाचारी लोकांच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत. त्यांच्याकडे असलेला स्वाभिमान म्हणजे सदाभाऊ खोत आमच्याकडे आहे,” असे ते म्हणले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@