अमेरिकेला चीन-रशियाचे आव्हान!

    21-Apr-2019   
Total Views | 107



 


३० वर्षांपूर्वी सोव्हियत युनियन खंडित झाल्यावर जागतिक राजकारणातील एक ध्रुव कोसळला व सारे राजकारण अमेरिकेभोवती फिरू लागले. जगावर अमेरिकेचा एकछत्री अंमल प्रस्थापित झाला होता. तो आता कमी होत असून जगात पुन्हा एकदा दोन महाशक्ती तयार होत असल्याचे दिसत आहे. सोव्हियत युनियनजवळ जी ताकद होती, ती रशियाजवळ नव्हती. रशिया आपल्या अंतर्गत आर्थिक संकटात सापडला होता.

 

पाकिस्तानमधील जैश-ए-मोहम्मदचा कुख्यात अतिरेकी मौलाना मसूद अझहरला ‘जागतिक दहशतवादी’ घोषित करण्याबाबत २३ एप्रिलची कोणतीही कालमर्यादा नाही, असे सांगून चीनने पुन्हा एकदा पाकिस्तानला पाठिंबा देण्याचा संकेत दिला आहे. अमेरिका, ब्रिटन व फ्रान्स या तीन राष्ट्रांनी मौलाना मसूद अझहरला जागतिक दहशतवादी घोषित करण्याबाबतचा एक प्रस्ताव संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत मांडला आहे. मात्र, चीनने तो तांत्रिक कारण दाखवून रोखून ठेवला आहे. चीनने उद्यापर्यंत म्हणजे २३ एप्रिलपर्यंत आपली भूमिका स्पष्ट करावी, असे या तीन राष्ट्रांनी सांगितले असल्याचे म्हटले जाते. त्याचा चीनने इन्कार केला आहे.

 

तांत्रिक मुद्दा

 

संयुक्त राष्ट्राची एक कार्यप्रणाली आहे. त्यानुसार जागतिक दहशतवादी घोषित करण्याची एक प्रक्रिया आहे. असा प्रस्ताव ‘समिती-१२६७’ समोर यावा लागतो. या समितीत त्यावर चर्चा व निर्णय होतो. या समितीतच मौलाना अझहरचा निर्णय व्हावा, अशी चीनची भूमिका आहे तर अमेरिकेसह तीन राष्ट्रांनी सरळ सुरक्षा समितीतच असा प्रस्ताव पारित करण्याची तयारी चालवली होती. चीनने ‘समिती-१२६७’ चा आग्रह धरला आहे. चीनजवळ व्हेटो म्हणजे नकाराधिकार असल्याने तो सुरक्षा परिषदेत मौलाना मसूद अझहरच्या प्रस्तावाला विरोध करू शकतो. मात्र, तसे करणे एका दहशतवाद्याला पाठिशी घालणे होईल, याची चीनला कल्पना असल्याने त्याने ‘समिती-१२६७’ मध्ये यावर चर्चा व निर्णय करण्याची मागणी केली आहे. मौलानाबाबत भारताची चिंता स्वाभाविक आहे. यासंदर्भात संबंधित पक्षांशी आपली चर्चा सुरू असून, येणाऱ्या काळात योग्य निर्णय होईल, असे आपल्याला वाटत असल्याचे चीनने म्हटले आहे. थोडक्यात मौलाना मसूदच्या मुद्द्यावर पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर एकाकी पडू न देण्याची भूमिका चीनने घेतली आहे. या साऱ्या प्रकरणात रशिया सक्रिय असल्याचे दिसत नाही, हे विशेष.

 

नवे समीकरण

 

मौलाना मसूदबाबत संयुक्त राष्ट्रात जे डावपेच लढले जात आहेत, त्यावरून जगाच्या क्षितिजावर नवे समीकरण तयार होत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. ३० वर्षांपूर्वी सोव्हियत युनियन खंडित झाल्यावर जागतिक राजकारणातील एक ध्रुव कोसळला व सारे राजकारण अमेरिकेभोवती फिरू लागले. जगावर अमेरिकेचा एकछत्री अंमल प्रस्थापित झाला होता. तो आता कमी होत असून जगात पुन्हा एकदा दोन महाशक्ती तयार होत असल्याचे दिसत आहे. सोव्हियत युनियनजवळ जी ताकद होती, ती रशियाजवळ नव्हती. रशिया आपल्या अंतर्गत आर्थिक संकटात सापडला होता. त्यातून बाहेर आल्यानंतर तो आता जागतिक राजकारणात सक्रिय होत असून, राष्ट्रपती पुतीन एक चतुर व महत्त्वाकांक्षी नेते म्हणून समोर येत आहेत. यात त्यांनी चीनला सोबत घेत अमेरिकेला आव्हान देणे सुरू केले आहे. पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तान जगात एकटा पडेल असे वाटले होते. ते चीन व रशिया यांनी होऊ दिलेले नाही आणि या दोन्ही देशांना मुस्लीम देशांनी साथ दिली.

 

इस्त्रायल-सीरिया

 

अमेरिकेने महिन्याभरापूर्वी-इस्रायलच्या ताब्यातील गोलन टेकड्यांवर इस्रायलचा अधिकार मान्य करणारा निर्णय घेतला. हा निर्णय इस्रायलच्या बाजूचा कमी आणि रशियाच्या विरोधात जादा होता, असे मानले जाते. कारण, रशियाने सीरियावर आपले वर्चस्व स्थापन केले आहे. सीरियात आजच रशियाचे ६५ हजार सैनिक आहेत. सीरियातील गृहयुद्धात रशियाने राष्ट्रपती असद यांना मोलाची मदत केली आहे. यासाठी रशियाच्या वायुदलाने ३९ हजार उड्डाणे भरली, ८६ हजार अतिरेक्यांना ठार केले. एक लाखावर अधिक ठिकाणी हवाई हल्ले केले. रशियाची सर्व अद्ययावत शस्त्रे सीरियात तैनात करण्यात आली आहेत. सीरियातील रशियाच्या या वाढत्या शक्तीला प्रतिशह म्हणून अमेरिकेने इस्रायलच्या गोलन टेकड्यांवरील अधिकार मान्य केला. म्हणजे दक्षिण आशियात भारत- पाकिस्तानबाबत जागतिक महाशक्तींमध्ये जे दोन तट पडले आहेत तसेच दोन तट मध्यपूर्वेत सीरिया-इस्रायल संबंधात दिसून येत आहे.

 

नवे युद्धक्षेत्र-व्हेनेझुएला

 

अमेरिका-रशिया यांच्यातील हे शीतयुद्ध अधिक वाढण्याची शक्यता असून, व्हेनेझुएलामध्ये हे दोन्ही देश परस्परांसमोर उभे ठाकले आहेत. पेट्रोलियम पदार्थांच्या बाबतीत सौदी अरेबियाला सर्वात मोठा देश मानले जात असले, तरी ते पूर्णपणे बरोबर नाही. सौदी अरेबिया कच्च्या तेलाचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन करीत असला तरी कच्च्या तेलाचा सर्वाधिक साठा व्हेनेझुएलामध्ये आहे. म्हणून या देशावर ताबा मिळविण्यासाठी अमेरिका-रशिया यांच्यात शह-प्रतिशह सुरू आहेत. तेथील सरकारला रशियाचा पाठिंबा आहे तर विरोधी पक्षाला अमेरिकेचा पाठिंबा आहे. रशियाने आपली लढाऊ विमाने व्हेनेझुएलात तैनात केली आहेत. याचा अर्थ येणाऱ्या काळात या देशात संघर्ष सुरू होणार, असे मानले जाते.

 

रशियाचा हस्तक्षेप

 

जागतिक राजकारणातील अमेरिकेच्या वर्चस्वाला आव्हान देण्याचा निर्णय रशिया व चीन या दोन्ही देशांनी संयुक्तपणे केला असल्याचे मानले जाते. मात्र, दोन्ही देशांची कार्यशैली वेगळी आहे. चीनने ‘वन बेल्ट, वन रोड’ अंतर्गत जगाला विळखा घालण्याची व्यूहरचना अवलंबली आहे. लहान देशांना मोठी कर्जे देऊन नंतर त्यांना आपल्या ताब्यात घेण्याचे चीनचे धोरण आहे. श्रीलंकेच्या हंबनटोटा बंदराबाबत चीनने फार कुटील डाव खेळला. त्याने श्रीलंकेला या बंदराच्या विकासासाठी मोठे कर्ज दिले. आपल्याच कंपनीला या कामाचा ठेका दिला आणि कर्जाची परतफेड करण्याची वेळ येताच श्रीलंकेचे कंबरडे मोडले. शेवटी त्याने हे मोक्याचे बंदर चीनला ९९ वर्षांच्या भाडेपट्ट्यावर चालविण्यासाठी दिले. जे चीनला हवे होते. चीन हेच पाकिस्तानच्या ग्वादर बंदराबाबत करणार आहे. चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर अंतर्गत या बंदराचा विकास केला जात आहे. चीनने ग्वादरमध्ये प्रचंड असे आंतरराष्ट्रीय विमानतळ बांधण्याची घोषणा केली आहे. एअरबस ३८० उतरू शकेल, असे हे विमानतळ बांधण्याचे काम सुरू झाले आहे. यासाठी चीनने मोठे कर्ज पाकिस्तानला दिले आहे. जेव्हा कर्जाची परतफेड सुरू होईल, पाकिस्तानचे कंबरडे मोडलेले असेल. मग, हे बंदरही चालविण्यासाठी चीनला देण्याचा करार केला जाईल.रशियाची कार्यशैली जरा वेगळी आहे. त्याने आपल्या तेल कंपन्यांना हाताशी धरून जगातील आपल्या हालचाली वाढविल्या आहेत. कालपर्यंत अमेरिकेच्या गोटात मानला जाणारा टर्की-अचानक रशियाच्या गोटात जाऊन बसला आहे. मध्यपूर्वेतील तेल उत्पादक देश रशियाला महत्त्व देऊ लागले आहेत. या देशांचे राष्ट्रप्रमुख मॉस्कोला हजेरी लावू लागले आहेत.

 

बेभरवशाचे ट्रम्प

 

जागतिक राजकारणात चीन-रशिया आपापल्या चाली खेळत असताना अमेरिकेचे राष्ट्रपती अंतर्गत समस्यांमध्ये अडकले आहेत. तशीही ट्रम्प यांची प्रतिमा बेभरवशाची आहे. बेभरवशाचा मित्र कामाचा नसतो. याचाच फायदा रशिया-चीन उठवित आहेत. पाकिस्तान, सीरिया, व्हेनेझुएला येथील घटनाक्रम बदलत्या जगाची नांदी आहेत. जगात पुन्हा एकदा दोन सुपरपॉवर तयार होत असल्याचे स्पष्ट संकेत या घटना देत आहेत.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

अग्रलेख
जरुर वाचा
एक डेपो, चार मेट्रो मार्गिका : मोघरपाडा येथे सर्वात मोठ्या एकात्मिक मेट्रो डेपोसाठी एमएमआरडीएला जमीन हस्तांतरित ; एमएमआरडीएने मोघरपाडा मेट्रो डेपोकरीता १७४ हेक्टर भूखंड केला संपादित; मेट्रो मार्गिका ४, ४ए, १० व ११ चे संचालन येथून होणार

एक डेपो, चार मेट्रो मार्गिका : मोघरपाडा येथे सर्वात मोठ्या एकात्मिक मेट्रो डेपोसाठी एमएमआरडीएला जमीन हस्तांतरित ; एमएमआरडीएने मोघरपाडा मेट्रो डेपोकरीता १७४ हेक्टर भूखंड केला संपादित; मेट्रो मार्गिका ४, ४ए, १० व ११ चे संचालन येथून होणार

सन्माननीय मुख्यमंत्री, श्री. देवेंद्र फडणवीस आणि सन्माननीय उपमुख्यमंत्री व एमएमआरडीएचे अध्यक्ष, श्री. एकनाथ शिंदे यांच्या द्रष्ट्या नेतृत्वांतर्गत, तसेच एमएमआरडीएचे महानगर आयुक्त, डॉ. संजय मुखर्जी (भा.प्र.से.) यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) ठाणे जिल्ह्यातील मोघरपाडा येथे एकूण १७४.०१ हेक्टर क्षेत्रफळ जमीन अधिकृतपणे ताब्यात घेतली आहे. या जागेवर जागतिक दर्जाचा, एकात्मिक मेट्रो कार डेपो उभारण्यात येणार आहे. हा डेपो मेट्रो ४, ४ए, १० आणि ११ या मार्गिकांसाठी एक केंद्रीय ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121