आचारसंहितेचा धाक दाखवून पोलिसांनी सराफाला लुटले

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Apr-2019
Total Views |




सराफाला लुटणाऱ्या चार पोलिसांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले


मुंबई : आचारसंहितेचा धाक दाखवून उदगीर (लातूर) येथे सराफी व्यापाऱ्याला लुटणाऱ्या चार पोलिसांना सेवेतून बडतर्फ केले आहे. याबाबतची माहिती विशेष पोलीस महानिरीक्षक (कायदा व सुव्यवस्था) मिलिंद भारंबे यांनी दिली. आचारसंहितेचा धाक दाखवून १.५ लाख रुपयांची लूट केल्याबाबत उदगीर (लातूर) येथील सराफा व्यापारी सचिन चन्नावार यांनी तक्रार दाखल केली होती. यावरून ही कारवाई केल्याचे त्यांनी सांगीतले.

 

याबाबत सविस्तर माहिती अशी की, उदगीर (लातूर) येथील सराफा व्यापारी सचिन चन्नावार हे सोमवारी रात्री ६ लाख रुपयांच्या रोख रकमेसह घरी जात असताना त्यांना ४ पोलीस कर्मचाऱ्यांनी अडवून पैशाबाबत चौकशी केली. त्यानंतर आचारसंहितेचा धाक दाखवून १.५ लाख रुपये काढून घेत उर्वरित रक्कम चन्नावार यांना परत केली. यानंतर चन्नावार यांनी लातूरचे पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार केली होती. यावरून या चार पोलिसांना अटक करून सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे.

 

पोलीस शिपाई श्रीहरी राम डावरगवे, श्याम प्रभाकर बडे, महेश बापूराव खेळगे, रमेश पंढरीनाथ बिर्ले अशी या चार पोलिसांची नावे आहेत. त्यांच्यावर भा.दं.वि. कलम ३९२, ३८४, ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@