
अमृतसर : 'हे कंपनीचे शेवटचे विमान आहे...आता आपण कधीच उड्डाण करू, शकणार नाही.', अशी उद्घोषणा पायलट मोहित कुमार यांनी केली आणि सर्व प्रवाशांचे डोळे पाणावले. सर्व प्रवासी भावूक झाले होते. जेट एअरवेजच्या या शेवटच्या विमानातील प्रवासाचे क्षण सर्वजणांच्या स्मरणात राहीले.
Picture of Jet Airways ground staff before the LAST FLIGHT took off from Amritsar...
— Vikram Singh (@VksinghSingh62) April 18, 2019
Good to see that in these troubled times they are still managing a smile and trying to keep their spirits high. Please Save #JetAirwaysCrisis @narendramodi pic.twitter.com/dnPbSvU2RI
भावनिक क्षण कॅमेऱ्यात टिपले
सरकारी विमान कंपनीनंतर सुरू झालेल्या एका खासगी विमान कंपनींच्या सुरुवातीपासून शेवटच्या विमानापर्यंत त्यांनी एक प्रवास अनुभवला होता. काहींनी त्यांच्या जेट एअरवेजच्या विमान प्रवासातील देश-विदेशातील किस्से ऐकवले. तर काहीजण विमानातील कर्मचाऱ्यांसह या भावनिक क्षणाला कॅमेऱ्याद कैद करत होते. With Capt Ronnie to be boarding on the Jets last flight of today from Amritsar to MUMBAI pic.twitter.com/UQlWlZ9iYg
२० हजार कुटूंबांवर संकट
कंपनी आर्थिक डबघाईला आल्याने जेटच्या २० हजार कर्मचाऱ्यांवर संकट ओढावले आहे. प्रवाशांनी कर्मचाऱ्यांनी विचारपूस करत त्यांचे सांत्वन केले. जेटच्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्यावर आणि परिवाराच्या व्यथा प्रवाशांसमोर मांडल्या. बुधवारी रात्री १०.३० वाजता मुंबईहून अमृतसरला जाणाऱ्या या कंपनीच्या शेवटच्या विमान उड्डाणातील क्षण सर्वांना आठवणी देऊन गेला. I didn't even think that this would be my last flight with #JetAirways on 10th Apr. THANK YOU Jiten and the entire crew of 9W610. Hope and Pray for the best for my fav airline. Missing you @jetairways 😭 This is really sad.#JetAirwaysCrisis pic.twitter.com/KT8dY8pl7S
मोहीत कुमार होते शेवटचे पायलट
मुंबई-अमृतसह हे शेवटचे विमान पायलट मोहीत कुमार उडवणार होते. लुधीयानातील अश्वीन भगत आणि त्यांचे पुत्र आशीष याच विमानात होते. बऱ्याच प्रवाशांना माहीत होते, हे या कंपनीचे शेवटचे विमान आहे. ज्यांना विमानात बसल्यावर ही गोष्ट कळली त्यांनीही खेद व्यक्त केला. सर्वांनी क्रू मेंबर्ससह फोटो काढले. कर्मचाऱ्यांना गेले तीन महिने वेतन मिळू शकले नव्हते. मात्र, कंपनी बंद पडल्याचे दु:ख त्यांना होते. The last flight of JET AIRWAYS . Being pushed back. Boeing 737-800. Registration VT-SJI. Flying from Amritsar to Mumbai. Took off at 10:19pm. #JetAirways pic.twitter.com/AV7VBmWFE5
मुलांचे शिक्षण, आजारपणाचा खर्च, कर्जाचे हप्ते थकले
जेट एअरवेजमध्ये सध्या २० हजार कर्मचारी होते. त्यांना गेल्या चार महिन्यांपासून वेतन मिळालेले नाही. त्यामुळे त्यांच्या रोजगाराचा प्रश्नही आवासून उभाच आहे. या कर्मचाऱ्यांच्या मुलांचे शिक्षण, कुणाच्या कर्जाचे हप्ते, कुणाच्या आजारपणावर होणारा खर्च आदी समस्या त्यांच्यासमोर उभ्या आहेत. कर्मचाऱ्यांची संख्या मोठी असल्याने त्यांना इतर ठिकाणी सहज नोकरी उपलब्ध होणेही कठीणच. With immediate effect, Jet Airways is compelled to cancel all its international and domestic flights. Last flight will operate today. https://t.co/chKa7Fnot3 pic.twitter.com/OknnvtTvmq
कमी पगारात काम करण्यासही तयार
कंपनीतील कर्मचाऱ्यांपैकी बरेचजण १६ ते २० वर्षांपासून सेवेत आहे. इतका अनुभव गाठीशी असूनही ते कमी पैशात इतर ठिकाणी नोकरी करण्यासाठी तयार आहेत. सुत्रांच्या माहितीनुसार, स्पाईसजेटने या पायलटला २५ ते ३० आणि अभियंत्यांना ५० टक्के कमी वेतनात काम करण्याचा प्रस्ताव दिला आहे. जेटच्या कर्मचाऱ्यांनी दुसऱ्या विमानसेवा देणाऱ्या कंपन्यांमध्ये अर्ध्या पगारात नोकरी करण्यासाठी संम्मती दर्शवली आहे. Jet Suspends Ops, tonight S2 3502 is the Last Flight From Amritsar To Mumbai pic.twitter.com/tDz7lgdwAM
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat