देशातील सर्वात लहान 'क्युट' कार होणार लॉन्च

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Apr-2019
Total Views |



आकर्षक किमतीत अत्याधूनिक सुविधा

 



नवी दिल्ली
: देशातील सर्वात लहान कार असलेली 'बजाज क्युट' कार भारतात १८ एप्रिल रोजी लॉन्च होणार आहे. ही भारताची पहीली मोटार टाटा नॅनोपेक्षाही लहान असणार आहे. या कारची किंमतही सर्वात कमी असणार आहे. या कारच्या पेट्रोलवर चालणाऱ्या व्हर्जनची किंमत २.६४ लाख रुपये आहे. तर सीएनजीवर चालणाऱ्या व्हर्जनसाठी २.८४ लाख रुपये मोजावे लागतील.


बजाज पूर्वीपासूनच क्युट कारची मॅन्युफॅक्चरींग करत होती. २०१२ ऑटो एक्पोमध्ये या ही कार प्रदर्शित करण्यात आली होती. मात्र, भारतात या कारचे लॉन्चिंग शक्य झाले नाही. २०१८ मध्ये परिवहन आणि राज्यमार्ग मंत्रालयाने वाहनांच्या नव्या श्रेणीसाठी मंजूरी दिल्यानंतर आता कायदेशीररित्या क्युट कार देशातील रस्त्यांवर धावणार आहे. या कारचा वापर औद्योगिक आणि वैयक्तिक कारणासाठी केला जाऊ शकतो.

 
 

वाहतूक कोंडीत अत्यंत सोयीस्कर अशा या कारमुळे प्रवास करणे सुलभ होणार आहे. इतर वाहनांच्या तुलनेत जागा कमी व्यापत असल्याने कमी जागेत गाडी उभी करणे शक्य होणार आहे. मात्र, कारमध्ये वातानुकूलीत यंत्रणा नाही. १२ इंचाचे रेड ग्रीपचे एलॉय व्हील असणार आहेत. पाऊस आणि उन्हाळ्यापासून संरक्षणासाठी गाडीत Weather protection असणार आहे. या सुविधांसह पर्यावरणाच्यादृष्टीने कमी कार्बन उत्सर्जन करणार आहे.

 

इलेक्ट्रीक व्हर्जनही लॉन्च करणार

बजाज दरवर्षी ६० हजार क्युट कार बनवण्याच्या तयारीत असून औरंगाबाद येथील कारखान्यात सध्या या कारची निर्मिती केली जात आहे. सध्या आशिया, युरोप आणि आफ्रीकेतील एकूण ३० देशांत या कारची विक्री केली जात आहे.



Bajaj Qute ची वैशिष्ट्ये

 

इजिंन - २१६ सीसी, सिंगल सिलिंडर ट्विन स्पार्क

पेट्रोल व्हर्जन - ५५०० आरएमपी, १३ बीएचपी पॉवर

सीएनजी व्हर्जन- १०बीएचपी पॉवर

ट्रांसमिशन- ५ - स्पीड गेअरबॉक्स

इंधन टॅंक - ८ लिटर

मायलेज (पेट्रोल) - ३५ किमी प्रति लीटर

मायलेज (सीएनजी) - ४३ किमी प्रति किग्रा

वजन - ४५० किलोग्राम


 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@