सेन्सेक्सने गाठला नवा उच्चांक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Apr-2019
Total Views |



दिवसभरात गाठला ३९ हजार ३५५ चा स्तर, निफ्टी ११ हजार ७८७ पार


मुंबई : गेले काही दिवस गुंतवणूकदारांचा सकारात्मक पवित्रा आणि बॅंकींग, ऑटोसह अन्य निर्देशांकांमध्ये झालेल्या चौफेर खरेदीमुळे मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ३६९ अंशांच्या तेजीसह ३९ हजारांच्या टप्प्यासह नव्या उच्चांकावर पोहोचला आहे. या महिन्यात ३९ हजारांचा टप्पा पार होण्याची ही दुसरी वेळ आहे. दरम्यान राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही ९६ अंशांच्या तेजीसह ११ हजार ७८७ च्या स्तरावर पोहोचला.

 

मंगळवारी दिवसभरातील सत्रात बॅंकींग सेक्टरमध्ये चांगली खरेदी दिसून आली. दिवसअखेर बॅंकींग क्षेत्रातील शेअर ५४६ अंशांच्या वाढीसह ३४ हजार ३७५ अंशांवर बंद झाले. ग्राहकोपयोगी वस्तूंच्या शेअरमध्ये २२१ अंश, वाहन क्षेत्रात १६८ अंश आणि औद्योगिक उत्पादन क्षेत्रात १७९ अंशांनी वाढ झाली. नैसर्गिक तेल आणि वायू क्षेत्र १३० अंशांनी वधारले.

 

सेन्सेक्समध्ये अदानी ग्रीन १९.१४ टक्के, पीजी ज्वेलर्स १५.६४ टक्के, दीपक फर्टीलायझर्स १३.५४ टक्के, स्पाईसजेट ११.१९ टक्के, टाटा स्टील ८.५५ टक्के, आयसीआयसीआय बॅंक २.९० टक्के, भारती इन्फ्राटेल २.२२ टक्के, कोल इंडिया १.९० टक्के, आओसी १.६२ टक्के आणि एशियन पेंटस् १.५५ टक्क्यांनी वधारले. तर जेट एअरवेज ७.६२ टक्के, रिलायन्स कॅपिटल ५.८४ टक्के, आरकॉम ४.४९ टक्के, रेन इंडस्ट्रीज ०.७६ टक्के, भारती एअरटेल ०.२६ टक्के आदी शेअरमध्ये घसरण नोंदवण्यात आली.

 

लोकसभा निवडणूकींपर्यंत बाजारात चढउतार

सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणूकांचा परिणाम शेअर बाजारावर जाणवत आहे. लोकसभा निवडणूकीच्या निकालांपर्यंत बाजारात मोठे चढउतार कायम राहणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@