राज्यात आघाडीचा ‘व्हाईटवॉश’ होणार : शाहनवाज हुसेन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Apr-2019
Total Views |



औरंगाबाद :देशातील जनतेला पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी हवे आहेत. देशातील जनभावना पूर्णपणे मोदींच्या बाजूने असून ओडिशा, पश्चिम बंगाल, पूर्वोत्तरराज्ये आणि केरळमध्ये पक्षाला मोठे यश मिळणार आहे. महाराष्ट्रातही मोदींच्याच तोडीचे काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. त्यामुळे महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला ‘व्हाईटवॉश’ मिळेल,” असा दावा भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शाहनवाज हुसेन यांनी औरंगाबादमध्ये केला. तसेच यावेळी देशभरात भाजप ३००पेक्षा अधिक जागा जिंकेल, असे भाकीतही त्यांनी केले.

 

जालना लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार व भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब पाटील-दानवे यांच्या प्रचारासाठी शाहनवाज हुसैन औरंगाबाद व जालना दौर्‍यावर आले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना वरील भावना व्यक्त केली. “आपण देशातील विविध राज्यांचा दौरा केला असून जवळजवळ सगळीकडे मोदी विरोधात सर्व पक्ष असाच सामना रंगला आहे. देशातील जनतेला मोदी हवे आहेत. विरोधी पक्षांना मोदी नको आहेत. मोदींना जगातील कोणतीही ताकद रोखू शकत नाही,” असे हुसेन यांनी सांगितले. पराभव दिसत असल्यामुळे विरोधकांनी ईव्हीएम मशीनवर राग काढण्यास सुरुवात केली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

 

आंधप्रदेशमध्ये मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांची अवस्था बिकट बनली. ते आता माजी मुख्यमंत्री बनणार आहेत. याशिवाय भाजपच्या पश्चिम बंगाल, केरळ, बिहार,पूर्वोत्तर राज्यामध्ये भाजपच्या जागा वाढणार आहेत. उत्तरप्रदेशमध्ये मागील वेळा ७३ जागा निवडून आल्या होत्या. यावेळी ७४ जागा निवडून येतील,” असा दावाही त्यांनी केला. वंचित बहुजन आघाडीसोबत संबंध नाही! वंचित बहुजन आघाडी ही भाजपची ‘बी टीम’ असल्याचा आरोप होत आहे. यावर बोलताना शाहनवाज हुसैन म्हणाले, दोन्ही पक्षांची स्वतंत्र विचारधारा आहे. एमआयएमसोबत भाजप कधीही जाऊ शकत नाही, त्यांच्याशी आमचे कोणतेही संबंध नाहीत. दोघांचे मार्ग वेगळे असल्यामुळे काँग्रेसकडून होत असलेले आरोप चुकीचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@