शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांचा भिवंडीत दौरा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Apr-2019
Total Views |



भिवंडी : भाजप, शिवसेना, रिपब्लिकन पक्ष (आठवले), श्रमजीवी संघटना महायुतीचे भिवंडी लोकसभेतील उमेदवार कपिल पाटील यांच्या प्रचारासाठी शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांचा शनिवारी झंझावाती दौरा होत आहे. या दौऱ्यात भिवंडी शहर, वाडा, शहापूर, मुरबाड आणि बदलापूर परिसरात महायुतीच्या कार्यकर्त्यांबरोबर संवाद साधण्यात येणार आहे. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या कार्यकर्त्यांत चैतन्य निर्माण झाले आहे.

 

गेल्या साडेचार वर्षांत ठाणे जिल्ह्यात विविध निवडणुकीच्या माध्यमातून शिवसेना व भाजपमध्ये लढत झाली होती. मात्र, भाजपचे पक्षाध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी युतीची घोषणा केल्यानंतर कार्यकर्ते एकत्र आले आहेत. आतापर्यंत प्रत्येक तालुक्यात महायुतीचे मनोमिलन मेळावे पार पडले असून, भिवंडी लोकसभा मतदारसंघात शिवसेना-भाजपमधील कटूता दूर झाली असल्यावर शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी शिक्कामोर्तब केले आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, आमदार रुपेश म्हात्रे, शांताराम मोरे यांच्याकडून प्रचाराला सुरुवात करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री एकनाथ शिंदे यांचा भिवंडी लोकसभा मतदारसंघाचा दौरा होत आहे.

 

पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्याला भिवंडीतून सुरुवात होईल. भिवंडी पूर्व, पश्चिम आणि ग्रामीण मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी भिवंडीतील ओसवाल हॉल येथे एकनाथ शिंदे यांच्याकडून सकाळी साडेनऊ वाजता संवाद साधतील. त्यानंतर वाडा तालुक्यातील वरले येथील लेक सिटीमध्ये सकाळी ११ वाजता, शहापूर विधानसभा क्षेत्रातील कार्यकर्त्यांशी शहापूर येथील कुमार हॉलमध्ये दुपारी तीन वाजता मेळावा होईल. तसेच महायुतीच्या शहापूर येथील जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन केले जाईल.



मुरबाड येथील नमस्कार हॉलमध्ये सायंकाळी ४ वाजता कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केल्यानंतर जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. तर बदलापूर येथील बाळा घोरपडे यांच्या कार्यालयाशेजारील मैदानात सायंकाळी साडेसहा वाजता मेळावा होईल. त्यानंतर जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन होणार आहे. 
या दौऱ्याची जोरदार तयारी केली जात आहे.



माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@