महाआघाडीला मोठे खिंडार : राधाकृष्ण विखे पाटील यांचा भाजप प्रवेश निश्चित

    10-Apr-2019
Total Views |


 

 

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा भाजप प्रवेश निश्चित झाला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला हा खूप मोठा धक्का मानला जात आहे. याचसोबत विजयसिंह मोहिते पाटील हे देखील भाजप प्रवेश करणार आहेत. अहमदनगरमधील सभेत १२ एप्रिल रोजी पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत राधाकृष्ण विखे पाटील भाजप प्रवेश करणार आहेत. तर १७ एप्रिल रोजी पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत अकलुजच्या सभेत विजयसिंह मोहिते पाटील भाजपप्रवेश करणार आहेत.

 

राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखे पाटील यांनी यापूर्वीच भाजपमध्ये प्रवेश करून लोकसभा लढवत आहेत. त्यानंतर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते मानले जाणारे राधाकृष्ण विखे पाटील यांचा भाजप प्रवेश म्हणजे काँग्रेससाठी ही मोठी नामुष्की असणार आहे. कारण निवडणुकीदरम्यान विरोधी पक्षनेतेपदावर असणाऱ्या व्यक्तीनेच पक्ष सोडल्याने कार्यकर्त्यांपर्यंत चुकीचा संदेश जाण्याची शक्यता आहे. राधाकृष्ण विखे पाटील हे गेल्या अनेक दिवसांपासून काँग्रेसमध्ये नाराजी असल्याचे दिसून आले. ही नाराजी त्यांनी वेळोवेळी बोलूनही दाखवली आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat