आर्थिक वर्षाची सुरुवात दमदार : सेन्सेक्सची ३९ हजारी पार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Apr-2019
Total Views |



मुंबई : नव्या आर्थिक वर्षाची सुरुवात होत असताना मुंबई शेअर बाजाराने ऐतिहासिक उसळी घेतली. सोमवारी शेअर बाजार उघडताच सेन्सेक्स ३२० अशांनी वधारत ३८ हजार ९९३ वर स्थिरावला होता. २९ ऑगस्ट २०१८ चा हा सर्वाधिक स्तर होता. त्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच सेन्सेक्सने ३९ हजारांचा टप्पा ओलांडला. शेअर बाजारात मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांकाने पहिल्यांदाच हा टप्पा ओलांडल्याने गुंतवणूकदार उत्साहित झाले आहेत.

 

राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीनेही ११ हजार ७०० हा टप्पा ओलांडला. ऑक्टोबर २०१८ मध्ये तो १० हजारांवर गेला होता. सोमवारी शेअर बाजारातील उसळीमुळे सार्वजनिक बॅंका, वाहन, धातू आदींचे शेअर वधारले. टाटा मोटर्सचा शेअर सहा टक्क्यांनी वधारला. ओएनजीसी आणि कोल इंडियाचे शेअर्समध्ये एक टक्क्यांनी घसरले.

 

दरम्यान आठवडाभरात आर्थिक घडामोडींबाबत अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले जाणार असल्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम थेट शेअर बाजारवर होणार आहे. रिझर्व्ह बॅंकेची २ एप्रिल रोजी बैठक होणार असून यामध्ये एमपीसीसंबंधित निर्णय, व्याजदरातील रेपो रेटमध्ये घट होण्याची अपेक्षाही केली जात आहे. याआधी ७ फेब्रुवारी रोजी रेपो रेटमध्ये ६.५० टक्क्यांवरुन ६.२५ टक्क्यांपर्यत घट करण्यात आली होती. लोकसभा निवडणुकीचा परिणामही बाजारावर जाणवणार आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा...facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@