Woman’s Day Special : रणरागिणी महाराष्ट्राच्या राजकारणातील

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Mar-2019   
Total Views |


 


८ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून जगभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. आपल्या महाराष्ट्रातदेखील महिला दिनाचा मोठा उत्साह दिसून येत आहे. स्त्रीच्या अस्तित्वाची जाणीव निर्माण करून देण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. आज प्रत्येक क्षेत्रात स्त्री कार्यरत असून तिने आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे. राजकारण क्षेत्रही याला अपवाद नसून महाराष्ट्राच्या राजकारणात महिलांचे मोठे योगदान आहे. आज घडीला अनेक महिला राजकारणी राजकीय मैदान गाजवत आहेत. म्हणूनच आज महिला दिनाचे औचित्य साधून सध्याच्या घडीला प्रतिथयश महिला राजकारण्यांविषयी थोडक्यात जाणून घेऊ...

 

 
 

पूनम महाजन

पूनम महाजन हे मराठी नाव सध्या देशभरात चर्चिले जाणारे नाव आहे. महाजन या भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्च्याच्या राष्ट्रीय अध्यक्ष असून उत्तर मध्य मुंबई मतदारसंघाच्या खासदार आहेत. २०१४च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेसच्या प्रिया दत्त यांचा १ लाखांपेक्षा अधिक मताधिक्याने पराभव केला केला होता. त्यांना राजकारणाचा वसा आपल्या वडिलांकडून म्हणजेच स्व. प्रमोद महाजन यांच्याकडून जरी मिळाला असला तरी त्यांची आजपर्यंतची कारकीर्द ही स्वकर्तुत्वाने उभी आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात त्या भाजपचा राष्ट्रीय राजकारणातील प्रमुख चेहरा झाल्यास आश्चर्य वाटायला नको.

 

 
 

पंकजा मुंडे-पालवे

माजी केंद्रीय ग्रामविकासमंत्री स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या अशी पंकजा मुंडे-पालवे यांची ओळख असली तरी महाराष्ट्रातील महिलांचे आणि बहुजनांचे धडाडीचे नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पहिले जाते. त्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महिला व बालकल्याण मंत्रालयाचा कारभार पाहातत. भारतीय युवा मोर्चापासून त्यांनी आपल्या कामाची सुरुवात केली होती. महाराष्ट्रात त्यांचा चांगला प्रभाव असून बहुजन व वंचित वर्ग त्यांना स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या रूपात पाहतो. महाराष्ट्रातील पहिल्या मुख्यमंत्री होण्याची आपली क्षमता असल्याचे त्यांनी अनेकवेळा बोलून दाखविले आहे.

 

 
 

सुप्रिया सुळे

सुप्रिया सुळे या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार आहेत. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या त्या कन्या आहेत. राष्ट्रवादीच्या महिला मोर्चाचे त्या नेतृत्व करत असून एक अभ्यासू नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पहिले जाते. सुरुवातीच्या काळात त्यांना राजकारणाची आवड नव्हती. मात्र, २००९ साली त्यांनी राजकारणात प्रवेश करत लोकसभेत प्रवेश केला होता. घरातून राजकारणाचा वारसा असला तरी, त्यांनी स्वकर्तुत्वाने जनतेच्या मनात आपली जागा निर्माण केली आहे.

 

 
 

डॉ. नीलम गोऱ्हे

डॉ. नीलम गोऱ्हे या शिवसेनेच्या प्रवक्त्या असून शिवसेनेतील एक महत्वाचे नाव आहे. राज्यातील महिलांच्या प्रश्नांसाठी व त्यांच्या हक्कासाठी त्या सतत लढा देत आल्या आहेत. राजकारांसोबतच त्यांनी गेली १७ वर्षे पूर्ण वेळ सामाजिक कामासाठी व लिखाणासाठी दिला आहे. पंचायत राज, महिला विकास, स्त्रियांवर होणारे अत्याचार या विषयावर त्यांनी आतापर्यंत तब्बल ५०० च्या वर व्याख्याने दिली आहेत. स्त्री आधार केंद्र व क्रांतीकारी महिला संघटनेच्या त्या संस्थापक - अध्यक्षा आहेत.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@