पत्त्यांसारखा कोसळला नीरव मोदीचा बंगला

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Mar-2019
Total Views |




अलिबाग : हिरेव्यापारी नीरव मोदी याच्या अलिबागच्या किहीम येथील रुप्पन्या बंगल्याला प्रशासनाकडून सुरूंग लावण्यात आला आहे. सीआरझेड कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी जिल्हा प्रशासनाचे अधिकारी, पोलीस, महसूल, बांधकाम अधिकारी, कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली आहे.

 

दरम्यान, सुरक्षिततेची काळजी म्हणून परिसरातील १०० मीटर पर्यंतचा परिसर मोकळा करण्यात आला होता. तसेच या परिसरात वाहनांनाही बंदी करण्यात आली. स्फोटक तज्ज्ञांनी बंगल्यातील एकूण ३ खांबांना स्फोटके लावली होती. त्यानंतर स्फोट घडवून हा बंगला उद्ध्वस्त करण्यात आला.

 

गुरुवारी रात्रीपासूनच हे काम सुरू होते. उपजिल्हाधिकारी भरत शितोळे यांनीही घटनास्थळी येऊन पाहणी केली आहे. नीरव मोदीचा बंगला स्फोटकांनी उडवल्यानंतर काही सेकंदात पत्त्यासारखा कोसळला. त्यामुळे अलिबाग किहीममधील 'नीरव मोदी पुराण'बंद झाल्याने नीरव मोदीच्या साम्राज्याला सुरूंग लावण्यात प्रशासनाला यश आले आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@