
बिकानेर : राजस्थानमध्ये नियमित टेहाळणी करण्यासाठी गेलेले मिग २१ विमान शुक्रवारी कोसळले. या घटनेत पायलट सुरक्षित असल्याची माहिती आहे. बिकानेर येथे भारतीय वायुसेनेचे मिग २१ हे विमान कोसळले. यातून पायलट सुरक्षितरित्या बाहेर पडला.
दरम्यान या घटनेची चौकशी सुरू असून विमानअपघाताचे कारण शोधले जात आहे. भारतीय हवाई दलाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून विमान अपघाताची तपासणी केली जात आहे. काही दिवसांपूर्वी भारतीय वायूदलाच्या हेलिकॉंप्टर अपघातात दोन पायलट शहिद झाले होते. हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने हा अपघात झाला होता. दरम्यान आज झालेल्या दुर्घटनेवेळी पायलट सुरक्षितरित्या बाहेर पडल्याने तो बचावल्याचे सांगण्यात येत आहे. बिकानेरजवळच्या नल येथे ही दुर्घटना घडली.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat