Woman’s Day Special : रणरागिणी उद्योगविश्वातल्या

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Mar-2019   
Total Views |



आज जागतिक महिलादिन, स्त्री पुरूष समानता या संकल्पनेनुसार जगभरात हा दिवस साजरा केला जात आहे तर जागतिक महिला दिनानिमित्त जाणून प्रशासकीय आणि व्यावसायिक क्षेत्रात आपल्या कर्तृत्वावर यशाचे शिखर सर करणाऱ्या रणरागिणीविषयी जाणून घेऊयात या माहितीलेखातून...





टेसी थॉमस मिसाईल वुमन

टेसी थॉमस यांची भारताच्या मिसाईल वुमन, अशी ओळख आहे. इस्त्रोतर्फे डिफेन्स रिसर्च अंड डेवलपमेंट ऑर्गनायाजेशनमध्ये त्या कार्यरत आहेत. शत्रुला धडकी भरवणाऱ्या अग्नि क्षेपणास्त्र प्रकल्पाच्या पहिला महिला संचालिका म्हणून त्यांनी काम पाहिले. पृथ्वी, आकाश, धनुष, त्रिशुल, ब्रम्होस’, अशा अनेक क्षेपणास्त्रांसाठी त्यांनी काम केले आहे. या कर्तृत्वामुळे भारताची अग्निपुत्री म्हणून त्यांची ओळख आहे. आज ४९ वर्षे वय असलेल्या ट्रेसी थोमस एक आदर्श गृहिणीही आहेत. करिअर आणि संसार दोन्हींशी सांगड घालून खऱ्या अर्थाने देशाच्या रणरागिणी ठरल्या आहेत.



 

जैवतंत्रज्ञानात भारताची मान उंचावणाऱ्या किरण शॉ मझुमदार

जैवतंत्रज्ञानाच्या मदतीने भारताचे नाव जागतिक पातळीवर नेऊन ठेवणाऱ्या उद्योजिका किरण शॉ मझुमदार यांनी बायोकॉन’, ही भारतातील पहिली जैवतंत्रज्ञान कंपनी स्थापन केली. १९७८ मध्ये सुरू केलेली ही कंपनी मधुमेह, कर्करोग आणि अन्य दुर्धर आजारांवर एकीकृत जैविक औषधांची निर्मिती करते. जैवतंत्रज्ञानाला औद्योगिक जोड देऊन आरोग्य क्षेत्रात भारताला महत्वाचे स्थान प्राप्त करून देणाऱ्या किरण शॉ मझुमदार या फोर्ब्सच्या यादीत पहिल्या शंभर महिलांपैकी एक आहेत. आरोग्य क्षेत्राबद्दलच्या या योगदानाबद्दल त्यांना हेरिटेज फाऊंडेशनतर्फे ऑथमर हे सुवर्णपदक मिळाले आहे, असे पदक मिळवणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला आहेत.



 

वाईन लेडी अचला जोशी

पनवेलच्या तळोजा येथील औद्योगिक वसाहतीला आंतरराष्ट्रीय पातळीवर थेट लंडनपर्यंत ओळख निर्माण करून देणाऱ्या आणि वाईन लेडी, अशी ओळख असणाऱ्या अचला जोशी आज वयाच्या ८० व्या वर्षी एखाद्या तरुणाला लाजवेल, अशा उत्साहाने, प्रामाणिकतेने आणि जोमाने मद्य व्यवसायात आपले स्थान टिकवून आहेत. डॉ. द. मा. फडके यांच्या कन्या असल्याने बालपणापासूनच साहित्य व संस्कृतिक वातावरणात जडणघडण झाली. एका पंचतारांकित हॉटेलमध्ये वाईनची चव चाखल्यानंतर आपल्या देशातही अशी वाईन तयार करण्याची जिद्द बाळगत सुरुवातीला घरच्या घरी वाईन बनवण्याचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर व्हॉगेस क्रिएशनच्या माध्यमातून वाईनरीचा उद्योग उभा केला. भारताचे माजी राष्ट्रपती दिवंगत डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या हस्ते उत्कृष्ट उद्योजिकेचा पुरस्कार मिळाल्यानंतर त्यांची द फर्स्ट वाईन लेडी, अशी ओळख निर्माण झाली.



 

सर्वात तरुण श्रीमंत व्यक्ती : काईली जेनर

काईली जेनर यांनी फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांना मागे टाकत २४ वर्षाच्या वयात अब्जाधीशांच्या यादीत आपले स्थान पटकावले आहे. नऊ हजार दशलक्ष डॉलर्सची काईली कॉस्मॅटीक्स ही कंपनी तीन वर्षांपूर्वी सुरू करण्यात आली होती. आजमितीला त्यांची संपत्ती १३१ अब्ज डॉलर्स इतकी आहे. टॉप मॉडेल किम कार्दशिअय यांच्या कुटूंबातून आलेल्या काईलीने वयाच्या २१ व्या वर्षी उद्योग सुरू करून फोर्ब्सच्या यादीत नाव पटकावले.



 

मराठमोळी ग्लोबल फॅशन डिझायनर : अनिता डोंगरे

भारतातील पन्नासहून अधिक शहरात प्रसिद्ध असलेल्या अॅण्ड आणि ग्लोबल देसी या ब्रॅण्डच्या रचनाकार अनिता डोंगरे यांनी फॅशनच्या दुनियेत स्वतःचे नाव कमावले आहे. अनिता डोंगरे ग्लासरुट या ब्रॅण्डसाठी जगभरातील कुशल कारागिरांना एकत्र आणत त्यांचे नक्षीकाम जगासमोर त्यांनी सादर केले. आपल्या कल्पनाशक्तीच्या जोरावर ब्रॅण्ड लोकांपर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलेल्या मुंबईकर अनिता डोंगरे यांनी हाऊस ऑफ अनिता डोंगरे आणि इंडियन फॅशन हाऊसची स्थापना केली आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@