भाजपचे संकेतस्थळ हॅक? सायबर हल्ल्याची शक्यता

    05-Mar-2019
Total Views |

 

 
 
 
 
नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाचे संकेतस्थळ मंगळवारी सकाळपासून ठप्प झाली असून संकेतस्थळाच्या मुखपृष्ठावर एक संदेश झळकतो आहे. या संदेशामुळे भारतीय जनता पक्षाचे अधिकृत संकेतस्थळ हँक झाले असल्याची चर्चा होत आहे. यासंदर्भात भाजपकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. एका खासगी वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार भाजपचे संकेतस्थळ हॅक झाले असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
 
 

 
 

दरम्यान, पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यानंतर देशात सायबर हल्ले होणार असल्याची भीती व्यक्त करण्यात येत होती. भाजपच्या संकेतस्थळावर सायबर हल्ला झाला असल्याचे म्हटले जात आहे. मंगळवारी सकाळी भारतीय जनता पक्षाची bjp.org हे अधिकृत संकेतस्थळ बंद पडले. ‘तुमचे ब्राऊझर तपासले जात आहे. असा संदेश या संकेतस्थळाच्या मुखपृष्ठावर झळकू लागला आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाची अधिकृत संकेतस्थळ हॅक झाले असल्याची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. भाजपकडून अजून या वृत्ताला दुजोरा देण्यात आलेला नाही.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat