रंगांच्या दुनियेतील चिह्न आणि चिह्नसंकेत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-Mar-2019   
Total Views |



मागील लेखात आपण ‘लाल’ या प्राथमिक रंगाचा परिचय आणि त्याचे विविध चिह्नसंकेतही जाणून घेतले. रंगांच्या दुनियेत लाल, पिवळा आणि निळा हे तीन मूलभूत आणि प्राथमिक रंग आहेत, याचाही उल्लेख केला होता. लाल रंगानंतर त्याच्या विरोधी गटातला रंग आहे हिरवा. हिरवा विरोधी गटात अशासाठी की लाल रंगाच्या अगदी विरुद्ध दृश्य संकेत, हा हिरवाच देत असतो.


निळा आणि पिवळा या दोन प्राथमिक रंगांच्या मिश्रणाने बनलेला हिरवा रंग हा पराकोटीच्या संमिश्र भावना व संवेदना व्यक्त करतो. निसर्गात सर्वत्र दिसणारा हा हिरवा रंग. नवा ऋतू वसंत ऋतू, नाविन्य-ताजेपणा, उमेद, इच्छा, आकांक्षा, शाश्वत, अनादी आणि अनंत अशा होकारात्मक भावना वा धारणा व्यक्त करतो. या बरोबरच मत्सर, हेवा, असुया, भेसूर, भयानक, गूढ वा रहस्यमय अशा नकारात्मक भावना किंवा धारणाही व्यक्त करतो. या पराकोटीच्या विरोधी भावना आणि संवेदना या रंगाच्या दृश्य स्वरूपांत आपल्या जागरूक मन आणि सुप्त मन अशा दोन्ही ठिकाणी नोंदविल्या जातात. निसर्गातील विविध छटांतील हिरव्या रंगामुळे प्रकाशाची आणि शांततेची संवेदना निर्माण होते. मानसिक आणि शारीरिक तणावमुक्ती यावर खरे म्हणजे हा रंग उत्तम इलाज आहे. हिरव्या रंगांच्या अनेक छटा म्हणजे आपले मन:स्वास्थ संतुलित ठेवण्यासाठीचा उत्तम इलाज आहे, असे म्हटले जाते. शरीर स्वास्थ्यासाठी या रंगाचे दुसरे वैशिष्ट्य असे की, आपल्या डोळ्यांसाठी हा सुखकारक आहे. हा रंग डोळे आणि नजरेला स्थिरता देतो. कारण, याच्याकडे पाहण्याची आपल्या डोळ्यांची क्षमता इतर रंगांपेक्षा जास्त आहे, म्हणून हा रंग आपल्या नजरेला सहनशील बनवतो. हा रंग जरी निसर्गाच्या आणि सजीवांच्या निर्मिती क्षमतेचा, प्रत्यक्ष निर्मितीचा आणि सर्जनशीलतेचा रंग म्हणून आपल्या परिचयाचा असला तरी, हा अनेकवेळा व्यक्ती अथवा फळ-भाजीपाल्याची अपरिपक्वता सिद्ध करतो. आता आंब्याचा हंगाम सुरू झाला आहे. हिरवा आंबा पिकल्याशिवाय गोड आणि रसाळ होत नाही, हे त्याच्या रंगावरून आपल्या सहज लक्षात येते. अनुभव नसलेल्या व्यक्ती अथवा अपूर्ण काम याचा संदर्भ देताना, इंग्रजीमध्ये ’ॠीशशप हेीप’ असे संबोधन वापरले जाते. विशेषकरून काँक्रिटचे ताजे बांधकाम, पाणी मारून नंतर पूर्ण सुकण्याआधी त्याला ’ॠीशशप लेपलीशींश’ असे संबोधन वापरले जाते. लाल रंग धोक्याचा इशारा देतो आणि त्या उलट हिरवा रंग सुरक्षिततेचा संकेत देतो. चौकातील वाहतूक नियंत्रण खांबावर लाल, हिरवा आणि अंबर या रंगांचा खेळ सतत सुरू असतो. जाहिरातीच्या क्षेत्रांत आणि कुठल्याही वस्तूच्या वेष्टनावर, हिरवा रंग अगदी नेमक्या उद्देशाने वापरला जातो. आमची औषधे वापरासाठी सुरक्षित आहेत असा अलिखित संदेश आणि अशी खात्री, अनेक औषधांच्या वेष्टनावरील हिरवा रंग आपल्याला देतो. काही पूर्ण नैसर्गिक उत्पादनांच्या वेष्टनावर अशा हिरव्या रंगाचा वापर केलेला दिसतो. अनेक देशांच्या चलनी नोटा, हिरव्या रंगाच्या अनेक छटांमध्ये छापलेल्या दिसतात. काही पाश्चिमात्य देशात व्यवहारातले कायदेशीर चलन आणि अर्थविषयक गोष्टींसाठी, गडद हिरवा रंग प्रतीक म्हणून वापरला जातो. बहुतेक सर्व देशातील लष्कराच्या सैनिकांचा गणवेश गडद हिरव्या रंगाचा असतो. या गडद हिरव्या रंगाच्या निव्वळ दर्शनाने आपल्याला सुरक्षित वाटते.

 

अनेक चित्रपटात, भेसूर-भयानक चेटकीण, हिरव्या रंगाच्या परिधानात किंवा चेहऱ्याच्या हिरव्या रंगभूषेत चित्रित केलेली असते. अनेकदा, निर्जन रानातील तळ्यावर, पाण्याचा पृष्ठभाग पूर्ण झाकून टाकलेले हिरव्या रंगाचे शेवाळ आपल्याला दिसते. असा भयपटातील चेटकीण आणि अशा हिरव्या तळ्याकडे बघितले की भेसूर-भयानक, गूढ-रहस्यमय अशा नकारात्मक भावना, धारणा वा संवेदना आपल्या मनात निश्चित निर्माण होतात. ग्रहमालेतील शुक्र व बुध हे ग्रह आणि अनुक्रमे शुक्रवार आणि बुधवार हे आठवड्यातील दोन वार आणि राशिचक्रातील वृषभ रास या सर्वांचे प्रतीक आपला हिरवा रंग आहे. फार प्राचीन काळापासून काही रंगांना विशिष्ट भूमितीय आकृतींच्या माध्यमातून व्यक्त केले गेले. द्विमिती षटकोन हे या रंगाचे पहिले भूमितीय प्रतीक आहे. याचा प्रत्येक कोन ३० अंशाच्या कोनात वळणारा आहे. हिरव्या रंगाचे दुसरे त्रिमिती भूमितीय प्रतीक म्हणजे ’खलेीरहशवीेपी.’ 20 समान समभूज त्रिकोणांचे पृष्ठभाग असलेल्या ही त्रिमितीय आकृतीला हिंदीमध्ये ‘विंशतीफलक’ असे संबोधन वापरले गेले. या दोन्ही आकृतींचे एक वैशिष्ट्य असे की, हे हिरव्या रंगाच्या एका वैशिष्ट्याशी चिह्नसंकेत म्हणून जोडले गेले आहे. चौरस आणि आयताच्या तीव्र काटकोनापेक्षा या द्विमिती षटकोनाचे आणि त्रिमिती आकृतीचे हे ३० अंशाचे सहा कोन सौम्य आहेत आणि वर्तुळाच्या जवळ जाणारे आहेत. हिरवा रंग मानवी डोळ्यांना कुठलाही ताण न देता सुखावणारा रंग आहे, सौम्य कोन असलेल्या या दोन भूमितीय आकृती, ही प्राचीन मांडणी फार तर्कसंगत आणि विज्ञाननिष्ठ आहे. हा रंग आवडणाऱ्या व्यक्ती किंवा या रंगाचा प्रभाव असलेला समाज यांचे एक खास वेगळे व्यक्तिमत्त्व उठून दिसते. आजच्या घडीला माझे हे विधान, परिस्थितीचा विपर्यास केल्यासारखे वाटेल कदाचित. मात्र, काही अतिरेकी अपवाद वगळता, जगभरातील हिरव्या रंगाचा प्रभाव असणारा समाज स्वत:ची खास संस्कृती जपून आहे. हिरव्या रंगाशी नाते असलेल्या व्यक्ती, समाज नेहमीच निसर्गासारखा ताजातवाना असतो, नैसर्गिक प्रवृत्तींशी प्रामाणिक असतो. सहिष्णू, सदाचारी, उदार मतवादी, दानशूर आणि नि:स्वार्थी या गुणवत्ता व्यक्ती आणि समाजाने धारण केलेल्या दिसतात. सतत प्रगती आणि आर्थिक उन्नती ही या रंगामुळे प्राप्त होणारी वृत्ती आहे.

 

वस्तुनिष्ठ आणि विषयनिष्ठ किंवा ’जलक्षशलींर्ळींश’ अनुभवाचा अभ्यास केल्यास लक्षात येते की, प्रत्येकाच्या निद्रिस्त मनात या रंगाने निर्माण होणाऱ्या संवेदना साधारण सारख्याच असतात. याच्या सान्निध्यात शांत-निवांत आणि ताजेतवाने वाटते. सभोवतालच्या निसर्गात सतत होणारी नवनिर्मिती आणि त्याची वाढ याने आपल्या नकळत आपणही प्रगती करत राहतो. या उलट व्यक्तिनिष्ठ आणि आत्मनिष्ठ किंवा ’र्डीलक्षशलींर्ळींश’ संवेदना खूपच वेगळ्या असतात. एखादे चित्र, पुस्तक, कपडे, एखादी शारीरिक व्याधी, एखाद्या वस्तूची अथवा घटनेची भीती अथवा स्वत:ची एखादी चूक आणि या सर्वातील समाविष्ट हिरवा रंग अनेकदा मनात किळस अनेक गोष्टींविषयी घृणासुद्धा निर्माण करतो. या रंगाच्या अनेक छटा विविध संकेत देतात आणि मनात संवेदनाही निर्माण करतात. एखाद्या चित्रातील अथवा कपड्याचा दृश्य स्वरूपातला गडद हिरवा रंग कामना, लालसा, महत्त्वाकांक्षा, मत्सर, ईर्षा आणि असुया अशा संवेदना एखाद्या व्यक्तीच्या मनात निर्माण करू शकतो. गडद हिरव्या रंगाच्या सान्निध्यात भीती, विसंगती, असंबद्धता, मतभेद तसेच असुया अशा संवेदना दुर्बल मनाच्या व्यक्तींमध्ये निर्माण होतात. जगभरातल्या तज्ज्ञांनी नोंदवलेल्या अभ्यासाचा आढावा घेतला, तर हिरवा रंग अनेक संदर्भांसाठी वापरला गेला आहे. भावना-संवेदना, राजकारण, धर्म, विज्ञान, कला, लिंग आणि पुराणकथा आणि दंतकथा या सर्वाचे विश्लेषण करताना हिरव्या रंगाचा संदर्भ निश्चितपणे येतोच. रंगांच्या अभ्यासाबरोबर आपल्या डोळ्यांवर म्हणजेच आपल्या डोळ्यातील संवेदनशील फोटोरिसेप्टरवर रंगांचा परिणाम काय होतो ते पाहणे आवश्यक आहे. याचे कारण असे की, डोळ्यातील फोटोरिसेप्टरवर नोंदलेला एखादा रंग क्षणात आपल्या मेंदूमध्ये काही शारीरिक आणि काही भावनिक संवेदना निर्माण करतो. तेजस्वी लाल रंगाकडे आपण ३० सेकंदापेक्षा जास्त वेळ पहिले, तर आपल्या डोळ्यांना थकवा येतो. या मागोमाग तुम्ही पांढऱ्या रंगाकडे पाहिले, तर आपल्या संवेदनेतील लाल रंग पुसला जातो आणि लाल रंगामुळे डोळ्यांवर पडलेल्या ताणावर नैसर्गिक इलाज म्हणून आपल्याला आपल्या नकळत, निसर्गत: हिरवा रंग दिसू लागतो. आपली जाहिरात किंवा उत्पादनाने लोकांच्या मनात पटकन संवेदना निर्माण कराव्या यासाठी याचा नेमका उपयोग, रंगांची निवड करताना चाणाक्ष डिझायनर करत असतात. निळा आणि पिवळा यांच्या मिश्रणाने हिरव्या रंगाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या गटांतील अनेक छटा बनविल्या जातात. तिसऱ्या गटांतील छटा बनवताना या छटांना काळ्या आणि अन्य रंगांचा हलकासा स्पर्श केलेला असतो. या अनेक हिरव्या छटांची इंग्लिश नावे त्याचे नेमके स्वरूप सांगतात. एमराल्ड, जेड, स्प्रिंग, लाईम, ओलिव्ह, मिडनाईट, टी, पाईन, फोरेस्ट, इंडिया, हंटर, आर्मी, अव्हाकॅडो, ब्रिटिश रेसिंग ग्रीन, शँमरॅाक, हार्लीक्वीन, फर्न, मर्टल, मॉस, टील आणि सॅप... अशा असंख्य नावांनी वेगवेगळ्या स्वभावधर्माच्या हिरव्या रंगाच्या या छटा जगभरात ओळखल्या जातात. या प्रत्येक छटेला काही निश्चित चिह्नसंकेत आहेत. या प्रत्येक छटेला विशिष्ट कामासाठीच वापरले जाते. यासारख्या हिरव्या रंगाच्या अनेक छटा, यंत्रांमधील वैशिष्ट्य आणि वेगळेपणा दाखवण्यासाठी उद्योग जगतात वापरल्या जातात. शब्दमर्यादेमुळे त्या सगळ्याच छटांची नोंद इथे करता येणार नाही. हिरव्याचा अभ्यास आणि हिरव्याची ही रंगगाथा...थोडीशी गूढ तरीही खूप उत्साहवर्धक आहे हे निश्चित...!!

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@