देशद्रोह करा, फाशी नाही!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Mar-2019   
Total Views |



कोणताही गंभीर गुन्हा करा, खून करा, लोकांना जाळा मारा, पण तुम्हाला फाशीची शिक्षा होणार नाही. दुसरे असे की, शिक्षणाचे भगवेकरण समाप्त केले जाईल. (पण भगवेकरण म्हणजे काय? आणि ते संपवून कोणते हिंसाकरण करायचे, ते विचारू नका) तिसरे मौखिक आहे. ते असे की, प्रशासन किंवा तत्सम व्यवस्थेत जे रा. स्व. संघ विचारांचे किंवा संबंधित लोक असतील, त्यांना तेथून हटविणार. पण, हे केव्हा? तर जेव्हा कम्युनिस्ट पक्ष सत्तेत येईल तेव्हा. या पक्षाने आपल्या अजेंड्यामध्ये या महत्त्वाच्या तरतुदी केल्या आहेत. कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया देशात तब्बल ७३ ठिकाणी लोकसभेची निवडणूक लढविणार आहे. डिपॉझिट जप्त होण्याची खात्री असतानाही निवडणूक लढण्याची खुमखुमी काहींना असते. ती का असते, याला अनेक कारणे आहेत. त्यापैकी एक पैशाची होणारी मोठी उलाढाल. दुसरे या निमित्ताने देशाला दिसते की, अमुक अमुक एक पक्ष आहे बरं का? मेला नाही. तर आपण जिवंत आहोत यासाठी वळवळ आणि चळवळ करण्यात या पक्षाचा कुणी हात धरू शकत नाही. या पक्षाचा अजेंडा पाहिला की वाटते, हा पक्ष भारतीय मातीशी, भारतीय मनाशी जोडलेला आहे का? ‘इस बार मोदी बेरोजगार’ असे म्हणे त्यांचे मिशन आहे. पण, करोडो भारतीयांच्या स्वप्नांना कर्तृत्व देणारे मोदी हे बेरोजगार होतील की नाही, ही गोष्ट दूरची. त्याआधी सीपीआयने स्पष्ट करावे की, पक्षाला निवडणूक का लढवायची आहे? सीपीआयचे गरीब वंचितांचे मोठे कैवारी आहोत, असे दाखवण्याचे एक लाडके ढोंग असते. ते ढोंग वठविण्यासाठी निवडणूक लढवणार का? व्यक्ती तितक्या प्रकृती आणि पक्ष तितके अजेंडे. पण, पक्षाने अजेंडा लोकभावनेचा विचार करून तरी करावा. पण, भारतीय विचारधारेशी जोडला असेल तर तो पक्ष लोकभावनेचा अजेंडा निर्माण करेल ना? कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचा याबाबत आनंदीआनंदच. या पक्षाची आताची उरलेली हयात रा. स्व. संघाला विरोध करण्यातच जात आहे. द्वेष मत्सर तरी किती असावा? आपण सत्तेत आल्यावर आपल्यापेक्षा वेगळे विचार असलेल्या रा. स्व. संघाच्या लोकांना त्यांच्या पदावरून हटविणार, ही कोणती मानसिकता? ही हिटलरशाही किंवा अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा ऱ्हास नाही का? कम्युनिस्ट पक्षाचा अजेंडा आहे का गुन्हेगारांना अभय आहे? देशद्रोह करा, फाशी नाही...

 

विद्यार्थी ते पोटार्थी कन्हैय्या!

 

कम्युनिस्ट पक्षाच्या कन्हैय्याकुमारची निवडणूक स्टाईल काय वर्णावी? ‘भारत तेरे तुकडे होंगे हजार’ म्हणत देशाचे तुकडे करू इच्छिणाऱ्या देशद्रोही आणि विघातक गँगचा सहकारी असलेला कन्हैय्या हा कम्युनिस्ट पक्षाचा हस्तक. अतिशय पद्घतशीरपणे हा वयस्क विद्यार्थी विघातक आणि फुकटचे वायफळ बोल बोलू लागला. कायदा-सुव्यस्थेला थोडा धक्का दिला, तर आपोआप प्रसिद्धी मिळते, हे त्याला चांगलेच ठाऊक. ‘जेथे फुटीर तेथे आम्ही’ हा त्यांचा बाणाच असावा, त्यामुळे देशभरात या काळात ज्या काही विघातक घटना घडल्या, त्यामध्ये कन्हैय्याचे कुठे ना कुठे लागेबांधे दिसले. हा काही योगायोग नव्हता. ही वाटचाल होती, मरू घातलेल्या कम्युनिस्ट पक्षाला जरा धुगधुगी देण्यासाठीची. असो तर, निवडणुकीच्या दिवसांत सर्वच राजकीय पक्ष, ‘उच्च न कोणी नीच न कोणी सत्तेेसाठी काहीहीहाच आपला धर्म खरोखर या न्यायाने अगदी सौजन्याने फॉर्मात वागतात. नेता झोपड्यात आणि कार्यकर्ता हॉटेलात जेवतानाचे दृश्यही दिसू लागते. मतदार राजाला लुभावण्यासाठी त्याला दारू, मटण आणि तत्सम भेटी देणे (म्हणजे चोरून चोरून देणे) या गोष्टी सामान्य आहेत. हे जर झाले नाही तर निवडणूक कसली हो? पण, बिहारच्या बेगुसराय येथून कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाच्या तिकिटावर लढणाऱ्या कन्हैय्याने एक वेबसाईट तयार केली. त्या वेबसाईटच्या माध्यमातून कन्हैय्याने निवडणुकीसाठी आर्थिक मदतीचे आवाहन केले. ७० लाख रुपये या माध्यमातून मिळवायचे आणि निवडणूक लढवायची, असा त्याचा उद्देश. आतापर्यंत २८ लाख रुपये त्याला मिळालेही. आता कन्हैय्या निवडणूक लढविण्यासाठी ‘दे माय सुट्टे गिर्‍हाण’ करणार. त्याला वेबसाईटच्या माध्यमातून आर्थिक मदत कोण करेल, हे सुद्धा सगळ्यांना माहिती आहे. पण, तरीही हे नाटक कन्हैय्या वठवत आहे. कारण, केवळ आणि केवळ संघद्वेष हे सूत्र घेऊन राजकारण करणे, हे तमाम राजकीय लोकांचे अन्न मिळवून द्यायचे साधन आहे. ते साधन कन्हैय्याची सर्वेसर्वा असलेली कम्युनिस्ट पार्टीही वापरते, हे सर्वज्ञात आहे. आता संघाच्या नावावर नकारात्मकरित्या का होईना, पोट भरण्यासाठी कन्हैय्याही निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे, इतकेच. विद्यार्थी ते पोटार्थी असा हा कन्हैय्याचा प्रवास...

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@