'कॉंग्रेसला उर्मिला मातोंडकरसाठी वेळ पण आमच्यासाठी नाही'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Mar-2019
Total Views |



पुणे : लोकसभा निवडणूकांचा प्रचार रंगला तरीही अद्याप काँग्रेसने पुणे लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी जाहीर केली नाही. अभिनेत्री उर्मिला मातोंडकरला काँग्रेसने प्रवेश देऊन उमेदवारी दिली मात्र, आमच्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्यासाठी काँग्रेसकडे वेळ नाही, अशी खंत पुणे लोकसभा मतदार संघासाठी इच्छुक असलेल्या प्रवीण गायकवाड यांनी व्यक्त केली आहे.


पुणे लोकसभा जागेसाठी काँग्रेसच्या उमेदवारीचा तिढा कायमच आहे. प्रवीणगायकवाड यांनीही इच्छुक उमेदवारांच्या स्पर्धेतून माघार घेत असल्याचे जाहीर केले. संजय काकडेंना कॉंग्रेसमध्य़े प्रवेश देत तिथल्या तिकीटावर लढवण्यासाठीची रणनिती खेळण्यात आली होती. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काकडे यांची मनधरणी करत कॉंग्रेसचा डाव उधळवून लावला आहे.


संजय काकडे यांची समजूत घालण्यात मुख्यमंत्र्यांना यश आले. भाजपकडून पुणे लोकसभा जागेसाठी गिरीश बापट यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. गिरीश बापट यांचा प्रचारही सुरू झालेला असताना अद्यापही काँग्रेसला पुणे लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवार मिळत नसल्याने प्रवीणगायकवाड यांनी इच्छा व्यक्त केली होती. मात्र, काँग्रेसकडून प्रवीणगायकवाड यांच्याबाबत निर्णय घेता आला नाही. त्यामुळे त्यांनी लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पुण्यातून भाजपचे गिरीश बापट यांच्याविरोधात कोणाला तिकीट मिळणार याची उत्सुकता आहे.


माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा...facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat



@@AUTHORINFO_V1@@