बीड : परळीतील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी नगरसेवक पांडुरंग गायकवाड यांची अनोळखी व्यक्तींनी तलवारीने वार करून हत्या केली. रविवारी मध्यरात्री त्यांच्यावर हा हल्ला झाला. त्यामुळे परळीत एकच खळबळ उडाली आहे. आहे. गायकवाड यांच्या पत्नी मीनाबाई गायकवाड विद्यमान नगरसेविका आहेत.
परळीतील एका उड्डाणपुलाखाली पांडुरंग गायकवाड यांची हत्या करण्यात आली. काही अनोळखी व्यक्तींनी चेहऱ्यावर सपासप वार केल्याने ते गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. हल्ल्यानंतर मारेकऱ्यांनी घटनास्थळाहून पळ काढला. गायकवाड यांच्यावरच्या हल्ल्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
दरम्यान अंतर्गत वादातून हा प्रकार घडला असावा, असा अंदाज वर्तवला जात आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला असून अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा...facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat