लोकसभा निवडणुकांसाठी आयोगाची नवीन 'हेल्पलाईन'

    21-Mar-2019
Total Views | 137



मुंबई : लोकसभा निवडणूक प्रक्रियेत सुसूत्रता आणि अधिकाधिक मतदारांच्या उपयुक्ततेसाठी भारतीय निवडणूक आयोगाने १९५० ही हेल्पलाइन सुरु केली आहे. या हेल्पलाइन अंतर्गत १५ मदत केंद्रे कार्यरत असून त्यामुळे मतदारांना कधीही माहिती सहज मिळण्यास मदत होणार आहे. २४ तास सुरु असणारी ही हेल्पलाइन सर्व जिल्ह्यात सुरु करण्यात आली आहे. याद्वारे मतदारांच्या विविध तक्रारींचे निवारण केले जाते.

 

मतदार यादीतील मतदारांच्या वैयक्तिक माहितीचे तपशील, मतदान केंद्र, बूथ लेव्हल अधिकारी, निवडणूक नोंदणी अधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी यांचे संपर्क क्रमांक याविषयीची माहिती यावरून मिळवता येते. या हेल्पलाईन क्रमांकावर मराठी, हिंदी व इंग्रजी अशा तीनही भाषांमधून माहिती मिळणार आहे. दरम्यान, निवडणूक संदर्भातील कोणत्याही प्रकारची तक्रार करायची असल्यास ceo.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर नोंदविता येणार आहे.

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121