भालचंद्र कोल्हटकर यांचे निधन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Mar-2019
Total Views |




डोंबिवली : ज्येष्ठ रंगकर्मी भालचंद्र कोल्हटकर यांचे बुधवारी सकाळी सातच्या सुमारास डोंबिवलीतील राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते. नाट्यचळवळीचा मोठा आधारस्तंभ हरविल्याची भावना नाट्यक्षेत्रातून व्यक्त केली जात आहे.


बालपणापासूनच नाट्यक्षेत्रात कार्यरत असलेले भालचंद्र कोल्हटकर यांनी डोंबिवलीतील गुरुदत्त मित्र मंडळात प्रवेश केला. युवा नाट्यकर्मींची संस्था, अशी ओळख असलेल्या या व्यासपीठाच्या माध्यमातून शहरातील नवोदित कलाकारांना एकत्र आणले जाते. शहरात नाट्यचळवळ रुजावी यासाठी संस्थेतर्फे प्रयत्न करतानाच त्यांनी 'सहलीला सावली आली', 'अर्ध्याच्या शोधात दोन' यांसारख्या प्रायोगिक नाटकात अभिनय केला.

राज्य नाट्य स्पर्धेच्या परिक्षणाची धुराही त्यांनी अनेक वर्ष सांभाळली. मागील काही दिवसांपासून त्यांना आजाराने ग्रासले होते. अखेरीस बुधवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने शहरातील सांस्कृतिक वर्तुळात पोकळी निर्माण झाली असून अखेरपर्यंत त्यांचा उत्साह ही त्यांची ओळख असल्याची भावना त्यांचे निकटवर्तीय अभिनेते नंदू गाडगीळ यांनी व्यक्त केली आहे.

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा...facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@