'रंगाचा बेरंग' रोखण्यासाठी पोलिस यंत्रणा सज्ज

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Mar-2019
Total Views |



डोंबिवली : शहरांत कोणतेही अचूक प्रकार होऊ नये यासाठी शरातील प्रमुख नाक्यांवर कडेकोट बंदोबस्त तैनात करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे. छेडछाड, फुगाफेक रोखण्यासाठी विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत. होळी तसेच धुळवडीच्या काळात शहरात कोणतेही अनुचित प्रकार घडू नये तसेच महिलांची छेडछाड होऊ नये, यासाठी शहरामधील प्रमुख नाक्यांवर कडेकोट बंदोबस्त तैनात करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे.

महिला छेडछाडीचे प्रकार रोखण्यासाठी पोलिसांनी महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांची विशेष पथके तयार केली असून ही पथके साध्या वेशात शहरामध्ये गस्त घालून फुगे फेकणाऱ्यांवर कारवाई करणार आहेत. सूचनांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात येणार आहे. याशिवाय, यंदा शहरामध्ये गस्त घालण्यासाठी पोलीस मित्रांचीही मदत घेण्यात येणार आहे. कल्याण-डोंबिवलीच्या शहर आणि ग्रामीण भागामध्ये होळी तसेच धुळवडीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
 

शहरातील नाक्या-नाक्यांवर धुळवड मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते, मात्र गेल्या काही वर्षांपासून पाण्याने व रंगाने भरलेले फुगे फेकण्याचे प्रकार वाढू लागले आहेत. विशेषत: महिला व तरुणींवर अशा प्रकारे फुग्यांचा मारा केला जातो. इमारतीच्या गच्ची व गल्लीबोळात लपून फुगे फेकले जातात. अशा फुग्याच्या माऱ्यामुळे अनेकांना मोठी दुखापत झाल्याचे प्रकार यापूर्वी उघडकीस आले आहेत. या पाश्र्वभूमीवर दरवर्षीप्रमाणे पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून यंदाही शहरात कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. त्यामध्ये अधिकारी व कर्मचारी, राज्य राखीव दल, होमगार्ड आदींचा समावेश आहे.




माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा...facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

 



 

@@AUTHORINFO_V1@@