मेहुल चोकसीची पंतप्रधान मोदींवर पीएचडी

    18-Mar-2019
Total Views | 79


 
 
 
सुरत : गुजरातच्या सुरतमधील एका विद्यार्थ्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर पीएचडीचा प्रबंध पूर्ण केला आहे. मेहुल चोकसी असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. मेहुलने राज्यशास्त्र विषयात पद्व्युत्तर शिक्षण पूर्ण केले. वीर नर्मद दक्षिण गुजरात विद्यापीठातून मेहुलने पीएचडीचा अभ्यासक्रम पूर्ण केला. ‘पीएचडी अंडर गव्हर्नमेंट- केस स्टडी ऑफ नरेंद्र मोदी’ हा विषय मेहुल चोकसीने पीएचडी अभ्यासक्रमासाठी निवडला होता. मेहुलने नुकताच हा प्रबंध विद्यापीठाकडे सुपूर्द केला आहे. या पीएचडी संशोधनाबाबत मेहुलने एका वृत्तसंस्थेला माहिती दिली.
 

या पीएचडी संशोधनासाठी केलेल्या सर्वेक्षणामध्ये मेहुलने ४५० जणांची मुलाखत घेतली आहे. गुजरातमधील शेतकरी, सरकारी अधिकारी, विद्यार्थी, राजकीय नेते इत्यादींचा या ४५० जणांमध्ये समावेश आहे. या मुलाखतींमध्ये मेहुलने पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वासंदर्भात लोकांना प्रश्न विचारले. मेहुलने प्रत्येकाला ४५० जणांपैकी प्रत्येकाला ३५ प्रश्न विचारले होते. पंतप्रधान मोदींची भाषणे ही इतर कोणत्याही नेत्यापेक्षा अधिक आकर्षक असल्याचे ४५० पैकी २५ टक्के लोकांनी सांगितले. मोदींना राजकीय मार्केटिंग चांगले जमते. असे मत ४८ टक्के लोकांनी व्यक्त केले. या सर्वेक्षणातील आकडेवारीसंदर्भात बोलताना मेहुलने ही माहिती दिली.

 

 
 
पंतप्रधान मोदींसोबत मेहुल चोकसी 
 

मेहुल चोकसी हा पेशाने वकील आहे. मेहुलने प्राध्यापक निलेश जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली हा पीएचडीचा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. २०१० साली मेहुलने पीएचडीच्या अभ्यासक्रमाला सुरुवात केली होती. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते. सुरुवातीच्या काळात ५१ टक्के लोकांनी या सर्वेक्षणात पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाबाबत सकारात्मक मते नोंदवली. ३४.२५ टक्के लोकांनी मोदींच्या नेतृत्वावर प्रश्नचिह्न उपस्थित करून नकारात्मक मत नोंदविले. मोदींनी जनतेच्या हितासाठी निर्णय घ्यायला हवेत. असे मत ४६.७५ टक्के लोकांनी नोंदविले. पंतप्रधान होण्यासाठी सकारात्मक नेतृत्व असणे गरजेचे आहे. असे मत ८१ टक्के लोकांनी नोंदविले. तर विश्वाससार्हता हा गुण पंतप्रधानांकडे असायला हवा. असे मत ३१ टक्के लोकांनी व्यक्त केले आहे. पंतप्रधानपदावर असलेला नेता निर्णयांबद्दल पारदर्शक असायला हवा. असे मत ३४ टक्के लोकांनी नोंदवले आहे. सर्वेक्षणाविषयीची अशी माहिती मेहुल चोकसीने दिली.

 

मेहुलच्या या पीएचडीबद्दल बोलताना त्याचे प्राध्यापक निलेश जोशी म्हणाले की हा विषय आम्हाला खूपच वेगळा वाटला. महत्त्वाच्या पदावरील व्यक्तीविषयी मतभेद न करता मते गोळा करताना आम्हाला अनेक अडचणी आल्या परंतु आम्ही मते गोळा करण्याचे काम योग्य प्रकारे केले. लोकांपर्यंत पोहोचून त्यांचे मत जाणून घेणे हे या पीएचडीमधील सर्वात कठीण काम होते.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121