जितेंद्र आव्हाड पुन्हा बरळले

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Mar-2019
Total Views |




 

ठाणे : सतत बेताल वक्तव्यामुळे चर्चेत असणाऱ्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पुन्हा एकदा बेताल वक्तव्य केले आहे. "गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे निधन हा राफेल प्रकरणाचा पहिला बळी आहे, अशी धक्कादायक प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांन दिली. एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.


पुलवामा येथे सीआरपीएफच्या जवानांवर झालेल्या भ्याड हल्ल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी असेच बेताल वक्तव्य केले होते. आता मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर केलेल्या या वक्तव्यामुळे त्यांच्यावर चोहोबाजूंनी टीका केली जात आहे. 
"गेलेल्या व्यक्तीबद्दल वाईट बोलू नये, पण हे वास्तव आहे असेही आव्हाड यांनी म्हटले आहे. राफेलची बोलणी सुरू झाल्यानंतर पर्रिकर अस्वस्थ झाले होते. दिल्लीचे राजकारण आपल्याला जमणार नाही हे त्यांनी ओळखले. त्यामुळे त्यांनी गोव्यात येऊन पुन्हा मुख्यमंत्री होण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या मनातल्या वेदना त्यांनी अनेक मित्रांना त्यांनी बोलून दाखवल्या होत्या. माझ्या मताप्रमाणे हा राफेलचा पहिला बळी आहे, असे बेताल वक्तव्य आव्हाड यांनी पुन्हा केले आहे.





रविवारी संध्याकाळी गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर गोवेकरांसह संपूर्ण देश हळहळत आहे. पर्रिकर यांना अखेरची मानवंदना सोमवारी सायंकाळी देण्यात आली. संरक्षण मंत्री असतानाच लष्कराने पहिला सर्जिकल स्ट्राईक केला. गेल्या वर्षभरापासून मनोहर पर्रिकर यांना स्वादुपिंडाच्या कर्करोगाशी लढा देत होते मात्र, त्यांची ही झुंज अखेर रविवारी सायंकाळी संपली. दरम्यान, मनोहर पर्रिकर यांच्या निधनाबाबत प्रतिक्रिया विचारली असता, जितेंद्र आव्हाड यांनी मात्र हा ऱाफेलचा पहिला बळी असल्याचे म्हटल्याने सोशल मीडियावर जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.


माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@