रिलायन्सतर्फे चौदाशे किमी लांबीच्या गॅस वाहिनीची विक्री

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Mar-2019
Total Views |
 

ब्रुकफिल्डशी १३ हजार कोटींचा करार


नवी दिल्ली
: जगातील सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत १३ व्या क्रमांकावर असणाऱ्या मुकेश अंबानी यांनी रिलायन्स उद्योगाच्या मालकीची चौदाशे किमी मालकीची गॅस वाहिनी विकण्याचा निर्णय घेतला आहे. कॅनडाची कंपनी ब्रुकफिल्डने या वाहिनीची खरेदी प्रक्रियाही सुरू केली आहे. रिलायन्स समुहाच्या इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीने १३ हजार कोटींच्या करारानंतर ही प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. क्षमतेपेक्षा पाच टक्केच वापर होत असल्याने ही वाहिनी विकण्याचा निर्णय रिलायन्स समुहाने घेतला आहे.


भारतात बांधकाम क्षेत्रात गुंतवणूक करणाऱ्या कॅनडाच्या ब्रुकफिल्ड कंपनीने याची अधिग्रहण प्रक्रिया सुरू केली आहे. या कंपनीकडे भारतातील २ कोटी १० लाख चौरसफुट कार्यालयीन क्षेत्र आहेत. यापूर्वी गेमन आणि केएमसी कन्स्ट्रक्शनतर्फे ७०० किमी टोल रोडची खरेदीही केली आहे.

विश्लेषकांच्या मते, नैसर्गिक वायुच्या वाहतूकीत वाहिन्यांचा कमी होत असलेल्या उपयोगामुळे या क्षेत्रावर ताण येत आहे. रिलायन्स समुहाच्या उत्पादनावरही याचा परिणाम जाणवू लागला आहे. फेब्रुवारी २०१४ मध्ये रिलायन्सचे ४.१ मिलियन मीट्रिक स्टैंडर्ड क्यूबिक मीटर प्रतिदिन (एमएमएससीएमडी) उत्पादन आहे. ते गतवर्षात ८ एमएमएससीएमडी होते. २०१४ ते २०१८च्या तुलनेत १२ टक्क्यांनी कमी झाले आहे.


माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat










@@AUTHORINFO_V1@@