युतीला घाबरून विरोधकांनी पळ काढला : मुख्यमंत्री

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Mar-2019
Total Views |



युतीचा पहिला मेळावा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत अमरावती येथे पार पडला

 

अमरावती : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीतमध्ये आज युतीचा पहिला मेळावा अमरावती येथे पार पडला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी भाजपा- शिवसेना युती ही अभेद्य असून ही निवडणुकीपूरती तसेच सत्तेसाठी युती नसून ही विचारांची युती आहे. म्हणूनच ती टिकली आणि भविष्यातही टिकणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.

 

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना भाजप युतीची झाल्यानंतर ही युतीचा पहिलाच मेळावा होता. यावेळी मुख्यमंत्र्यांनी युतीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरला. याशिवाय २०१४ला ४२ जागा जिंकत आम्ही रेकॉर्ड केला होता, मात्र तो खरा रेकॉर्ड नसून, खरा रेकॉर्ड तर २०१९मध्ये होणार असल्याचे सूतोवाच मुख्यमंत्र्यांनी केले. पूर्ण ताकदीने महाराष्ट्राला भगवे केल्याशिवाय राहणार नसल्याचेही ते म्हणाले. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित होते.

 

काहींनी घाबरून आधीच माघार घेतल्याचा टोला मुख्यमंत्र्यांनी पवारांचे नाव न घेता लगावला. मोदी लाट पाहून आता कोणताच कॅप्टन उभा राहायला तयार नाही. एक माघार घेतो, दुसरा म्हणतो मी उभा राहणार नाही, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला. "सत्ता येईल, जाईल. पण देश महत्वाचा आहे. हा नवीन भारत आहे. ये घुसेगा भी और ठोकेगा भी!. भाजप सरकारच्या काळात सर्वकाही शक्य असल्याचा विश्वास जनतेमध्ये निर्माण झाला आहे. त्यामुळे निवडणुकीतील विजयापेक्षा लोकांच्या चेहऱ्यावरील समाधान अधिक आनंद देतो." असे मुख्यमंत्री म्हणाले.

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@