आता एटीएम कार्डविना काढता येणार पैसे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Mar-2019
Total Views |



 

मुंबई : योनो एसबीआय या भारतातील पहिल्या एकात्मिक ओम्नी-चॅनल बँकिंग व लाइफस्टाइल सुविधेने एसबीआयच्या देशभरातील १६ हजार ५०० एटीएममधून कार्डाविना पैसे काढण्याची सोय देण्यासाठी योनो कॅश सेवा जाहीर केली आहे. योनो कॅश सेवा सुरू केल्याने, या क्षेत्रात अशी सेवा देणारी एसबीआय ही पहिली बँक ठरली आहे. या सेवेसाठी सज्ज करण्यात आलेल्या एटीएमना योनो कॅश पॉइंट असे म्हटले जाईल. सुरक्षेचे वैशिष्ट्य व कार्डाविना पैसे काढण्याची सोय, यामुळे योनो कॅश ग्राहकांसाठी सोयीची ठरेल, अशी अपेक्षा बँकेला आहे.

ग्राहकांना पैसे काढण्याची प्रक्रिया योनो अॅपवर सुरू करता येऊ शकतो आणि व्यवहार करण्यासाठी सहा आकडी योनो कॅश पिन देता येऊ शकतो. त्यांना व्यवहार करण्यासाठी त्यांच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर एसएमएसद्वारे सहा आकडी रेफरन्स नंबरही येईल. मिळालेला रेफरन्स नंबर व पिन वापरून पुढील ३० मिनिटांच्या आत योनो कॅश पॉइंटवर जाऊन पैसे काढण्याची प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे आहे.

एसबीआयचे अध्यक्ष रजनीश कुमार म्हणाले कि, योनो कॅश हे ग्राहकांना उत्तम बँकिंग सेवा देण्यासाठी व अधिकाधिक सोय देण्यासाठी बँकेने उचलेले आणखी एक पाऊल आहे. हा उपक्रम, पैसे काढण्यासाठी एटीएममध्ये डेबिट कार्ड वापरण्याबद्दलची ग्राहकांची चिंताही दूर करणार आहे व त्यासंबंधीची संभाव्य जोखीम नाहीशी करणार आहे. भौतिक स्वरूपातील कार्ड न वापरता पैसे काढणे शक्य व्हावे, यासाठी योनोवरील हे वैशिष्ट्य तयार केले आहे. येत्या दोन वर्षांत, संपूर्ण व्यवहार एकाच सुविधेखाली आणखी सर्व सेवा डिजिटल करण्याचा आमचा योनोद्वारे प्रयत्न असणार आहे.

देशात आर्थिक व जीवनशैलीविषयक सेवांचा लाभ ज्या प्रकारे घेतला जातो, त्यामध्ये सुधारणा करण्यासाठी योनो एसबीआय हे मोठे पाऊल आहे. ८५ ई-कॉमर्स कंपन्यांकडून कस्टमाइज्ड उत्पादने व सेवा देणारी ही पहिली सर्वंकष डिजिटल बँकिंग सुविधा आहे. योनो एसबीआय नोव्हेंबर २०१७ मध्ये दाखल झाले आणि आता ही सुविधा एक वर्षाची झाली असून ग्राहकांकडून मोठी पसंती मिळवत आहे. फेब्रुवारीपर्यंत, योनोने १८ दशलक्षहून अधिक डाउनलोडची नोंद केली आहे आणि ७ दशलक्षहून अधिक सक्रिय युजर आहेत. अँड्रॉइड व आयओएस असणाऱ्या मोबाइल फोनद्वारे आणि ब्राउजरद्वारे वेबवर योनोचा वापर करता येऊ शकतो. त्यामुळे ही सेवा सर्वत्र सुरळीतपणे वापरता येऊ शकते. ग्राहकांच्या अधिक सोयीसाठी, एसबीआय येत्या काही महिन्यांत योनोवर आणखी काही वैशिष्ट्ये समाविष्ट करणार आहे.

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@