मातीची जाण असलेला ‘कलावंत’

    13-Mar-2019   
Total Views | 149

 

 
 
 
प्रथितयश नाट्यदिग्दर्शक प्रा. वामन केंद्रे यांना देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार मानल्या जाणाऱ्या ‘पद्मश्री’ने गौरविण्यात आले. त्यानिमित्ताने त्यांच्या कारकिर्दीचा आढावा घेणारा हा लेख..
 

राष्ट्रीय नाट्य विद्यालयाच्या वतीने (एनएसडी) नाट्य क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी दिला जाणारा ‘बी. व्ही. कारंथ पुरस्कार’ यंदा प्रथितयश नाट्यदिग्दर्शक प्रा. वामन केंद्रे यांना नुकताच जाहीर झाला. या वर्षाच्या सुरुवातीचा हा त्यांना मिळालेला दुसरा मोठा सन्मान. कारण, काही दिवसांपूर्वीच त्यांना देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार मानल्या जाणाऱ्या ‘पद्मश्री’ने गौरविण्यात आले. यामुळे पुन्हा एकदा वामन केंद्रे हे नाव चर्चेत आले. मागील ३० वर्षांपेक्षा जास्त काळ त्यांनी रंगभूमीसाठी वाहिला. तसेच कित्येक कलावंतांना घडविण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. ‘प्रथितयश रंगकर्मी,’ ‘प्रतिभावंत नाट्यदिग्दर्शक,’ ‘हरहुन्नरी प्राध्यापक’ अशा कित्येक उपाधी त्यांना दिल्या तरी, त्या कमीच पडणार आहेत. अशा या प्रथितयश रंगकर्मी व नाट्यदिग्दर्शक प्रा. वामन केंद्रे यांच्याविषयी आपल्या ‘माणसं’ या सदरातून जाणून घेणार आहोत.

 

सदान्कदा पाचवीला पुजलेला दुष्काळ, बीड जिल्ह्यात केज तालुक्यातील असलेले दरडवाडी गाव, घरची कोरडवाहू शेती, हातावर पोट असणाऱ्या कुटुंबात प्रा. वामन केंद्रे यांचा जन्म झाला. त्यांच्या जन्माच्या वेळी कोणी जर म्हणाले असते की हा पोरगा पुढे जाऊन दिल्ली गाजवेल’ तर त्यावर कोणी विश्वास ठेवला नसता. वामनराव यांचा जन्म माधवराव व मुक्ताबाई केंद्रे दाम्पत्याची व त्यांच्या पूर्वाजांची पुण्याईच म्हणावी लागेल. कारण, घरात वारकरी परंपरा असल्यामुळे भजन, ओव्या व भारूडांचा वारसा त्यांना लाभला. त्यामुळे साहजिकच घरात अत्यंत धार्मिक वातावरण. त्यांचे वडील शेतीसोबत आपला भारूडांचा वारसा पुढे चालवत होते. घरातील या वातावरणामुळेच वामन यांच्यावर लोककला व परंपरांचे संस्कार होत गेले. खेडेगावात त्यावेळी शिक्षणाची सोय नव्हती. मग काय, शाळेसाठी त्यांना पाच किलोमीटर असणाऱ्या बाभळगावपर्यंत पायपीट करावी लागे. घर-शाळा-भजन-भारूड असा त्यांचा नित्यक्रम... अशातच बाभळगावच्या जत्रेत विद्यार्थीदशेत वामन यांनी एक नाटक सादर केले आणि या नाटकासाठी त्यांना शाबासकी मिळाली. मग काय, वामनरावांचा आत्मविश्वास अधिकच दुणावला आणि आता आपण नाट्यक्षेत्राला सर्वस्व अपर्ण करायचे, त्याने ठरवूनच टाकले. हाच निर्णय यांच्या आयुष्याचा ‘टर्निंग पॉईंट’ म्हणावा लागेल.

 

केंद्रे यांनी आपल्या नाटकाच्या वेडासाठी वाट्टेल ते करण्याची तयारी ठेवली. बीडला महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी बालगंधर्व रंगमंदिरात एक दिवस नाटक केले आणि त्या एका रात्रीत वामन केंद्रे ‘स्टार’ बनले. यानंतर दिल्लीतील राष्ट्रीय नाट्य विद्यालयात प्रवेश घेण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला. मात्र, पहिल्या प्रयत्नामध्ये त्यांना यश आले नाही. खचून न जाता त्यांनी औरंगाबाद विद्यापीठात एक वर्षाचे नाट्य प्रशिक्षण घेतले. यानंतर मात्र त्यांनी ‘एनएसडी’त प्रवेश मिळवला. अखेर स्वप्न पूर्ण झाल्याचा त्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना आनंद झाला. ‘एनएसडी’त शिक्षण पूर्ण करत असताना त्यांना लोककलांचा खूप फायदा झाला. याच आधारे केरळच्या लोककलांचा अभ्यास करण्यासाठी त्यांना शिष्यवृत्तीदेखील मिळाली. अखेर ‘एनएसडी’तून शिक्षण पूर्ण करून केंद्रे मुंबईत आले आणि त्यांचा रंगकर्मींचा खराखुरा प्रवास सुरू झाला. मुंबईत त्यांना पहिल्यांदा संधी दिली ती ए. के. हंगल व नारायण सुर्वे यांनी. त्यांनी डबघाईला आलेल्या ‘इप्टा’ या नाट्यसंस्थेची जबाबदारी केंद्रे यांच्यावर सोपवली आणि तिथून आजपर्यंत त्यांना कधीच मागे वळून पाहावे लागले नाही.

 

मराठी नाट्यक्षेत्रात केंद्रे यांनी नाट्यदिग्दर्शक म्हणून तर इतिहासच घडविला. त्यांनी संस्कृत नाटककार भास यांच्या ‘मध्यमव्यायोग’ या नाटकाची तीन भाषांमध्ये निर्मिती केली. इंग्रजीमधील ‘ओ माय लव्ह’ या नाटकाला हिंदीत ‘मोहे पिया’ आणि मराठीमध्ये ‘पिया बावरी’ अशा तीन अप्रतिम कलाकृती... या नाट्यकृती प्रचंड गाजल्या. याव्यतिरिक्त त्यांनी कित्येक नाटके दिग्दर्शित केली, ज्यांनी इतिहास घडविला आहे. २०१८ मध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली भारतामध्ये जगातील सर्वात मोठा नाट्यमहोत्सव आठवे थिएटर ऑलिम्पिक्स मोठ्या दिमाखात यशस्वीरित्या पार पाडले. मागील दहा वर्षांपासून ते मुंबई विद्यापीठाच्या ‘थिएटर अ‍ॅकॅडमीचे प्रमुखपद भूषवित आहेत. यासोबतच ते आकाशवाणी, दूरदर्शन आणि सत्यजित रे ‘फिल्म अ‍ॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ सोसायटी ऑफ गव्हर्निंग कौन्सिल’च्या सल्लागार समितीवर ते कार्यरत होते. याशिवाय रंगभूमीचे विविध पैलू शिकविण्यासाठी वामन केंद्रे यांनी आजपर्यंत भारतात आणि परदेशात तब्बल अडीचशेपेक्षा अधिक कार्यशाळा आयोजित केल्या आहेत. काही वर्षांपासून त्यांनी दरवाडी येथे माधवराव केंद्रे यांच्या स्मरणार्थ राष्ट्रीय भारूड महोत्सव’ सुरू केला. माणसं मोठी झाली की गाव विसरतात, पण केंद्रे यांची गावाकडची ओढ कायम आहे. नाट्यक्षेत्रातील त्यांच्या या योगदानामुळे २०१२ साली त्यांना भारत सरकारचा नाट्य दिग्दर्शनासाठीचा ‘संगीत नाटक अकादमी पुरस्कार’ मिळाला. यांसारखे कित्येक पुरस्कार त्यांच्या नावावर आहेत. सतत नवनवे प्रयोग, नवे आयाम, नवी झेप आणि ऊर्जेचा स्रोत असलेले वामन केंद्रे यांच्या प्रतिभावंत कलाकृती यापुढेदेखील पाहायला मिळतील, हीच सदिच्छा...!

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

 
 

विजय डोळे

दै. 'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब सब एडिटर म्हणून कार्यरत, ३ वर्षांपासून मेन स्ट्रीम मीडिया व डिजिटल मीडियामध्ये कामाचा अनुभव असून पुणे विद्यापीठामधून मास कम्युनिकेशनमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण. अनेक लघुपटांसाठी, विविध वेबसाईटसाठी लेखन, डिजिटल मीडिया तसेच शॉर्ट फिल्म प्रॉडक्शन आदी कामाचा अनुभव...

अग्रलेख
जरुर वाचा
वसईत योगेश्वर भावकृषी लागवडीसाठी शेतात स्वाध्यायींचा भक्तिमय भावार्थ , बालसंस्कार केंद्रातील मुलेही रमली चिखलात

वसईत योगेश्वर भावकृषी लागवडीसाठी शेतात स्वाध्यायींचा भक्तिमय भावार्थ , बालसंस्कार केंद्रातील मुलेही रमली चिखलात

परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवले प्रेरित स्वाध्याच्या अनेक प्रयोगातील योगेश्वर भावकृषिचा प्रयोग म्हणजे ईश्वराच्या भक्ती बरोबर सर्वांनी मिळून सामाजिकता जपण्याचे भान ठेवणारा अनोखा प्रयोग . याप्रमाणे वसई तालुक्यातील अनेक गावांत सद्ध्या योगेश्वर भावकृषि लागवड सुरू असून स्वाध्यायींचा श्रमभक्तिमय भावार्थ यातून दिसून येतो.वसई पूर्वेतील एका गावात अश्याच प्रकारच्या भावार्थाने स्वाध्यायीं भातशेती लागवडीसाठी रविवारी कृषिवर एकत्र आले होते.यामध्ये बालसंस्कार केंद्रातील मुलेही समाविष्ट झाली होती.यावेळी मुलांची ..

वंशावळीतून वगळणे ही फसवणूकच; सर्वोच्च न्यायालयाचा बहिणींना दिलासा

वंशावळीतून वगळणे ही फसवणूकच; सर्वोच्च न्यायालयाचा बहिणींना दिलासा

बेंगळुरू मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (बीएमआरसीएल) कडून ३३ कोटी रूपयांची भरपाई मिळवण्यासाठी वंशावळ आणि विभाजन करारात खोटेपणा करून पाच बहिणींना संपत्तीतून वगळल्याच्या आरोपावरून सर्वोच्च न्यायालयाने दोन आरोपीविरुद्ध फौजदारी खटला चालवण्याचे निर्देश नुकतेच दिले आहेत. याबाबतीत न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्या. पी.बी. वराले यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले की, “प्रथमदर्शनी पुरावे असे दर्शवतात की संबंधित कागदपत्रे मुद्दाम खोटी तयार करण्यात आली असून, त्याचा उद्देश दिवंगत के. जी. येल्लप्पा रेड्डी यांच्या पाच मुलींना ..

कल्याणच्या एपीएमसी मार्केट संचालकावर राजीनामा देण्याची आली वेळ - प्रशासकाच्या मनमानी कारभारा विरोधात संचालकांचा संताप

कल्याणच्या एपीएमसी मार्केट संचालकावर राजीनामा देण्याची आली वेळ - प्रशासकाच्या मनमानी कारभारा विरोधात संचालकांचा संताप

कल्याणच्या एपीएमसी मार्केटमधील भूखंड लक्ष्मी मार्केट व्यापारी संघटनेला दिल्यानंतर एपीएमसीमधील संचालक प्रशासकावर चांगलेच संतापले आहे. हा भूखंड नियमबाह्य पद्धतीने दिला गेला असल्याचा आरोप करीत आमच्या संचालकांच्या चालत नाही तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जाऊन राजीनामा देण्याचे विधान केल्याने राजकीय वर्तूळात एकच खळबळ उडाली आहे. लक्ष्मी मार्केटच व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. घेतलेला भूखंड हा कायदेशीर आहे. एपीएमसीमधील काही लोक आर्थिक फायद्यासाठी हे सगळे करीत आहे. या वादामुळे एपीएमसी व्यापारी ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121