www @ 30 विशेष : गुगल डुडलतर्फे सन्मान

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Mar-2019
Total Views |



www अर्थात world wide web ला आज ३० वर्ष पूर्ण झाल्याबद्दल गुगलने एक आगळेवेगळे डुडल बनवून www चा अनोखा सन्मान करण्यात आला आहे. ब्रिटिश इंजिनिअर आणि संगणक शास्त्रज्ञ टीम बर्नर ली यांनी मार्च १९८९ मध्ये पहिल्यांदा वर्ल्ड वाईड वेबचा प्रस्ताव तयार केला.

 




६ ऑगस्ट १९९१ रोजी पहिले संकेतस्थळ ऑनलाईन झाले होते. यानंतर टीम बरनर्स ली यांनी १९९२ मध्ये पहिल्यांदा छायाचित्र अपलोड केले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जिथे वास्तव्य करतात त्या व्हाईट हाउसची वेबसाईट सुरू झाली. त्याचवर्षी १९९३ मध्ये ‘वर्ल्ड वाईड वेब’ ज्याला संगणकीय भाषेत ‘www’ म्हटले जाते, ते माहितीचे मायाजाल सार्वजनिक झाले.



१९९३ मध्ये मोझॅक वेब ब्राउझर लाँच झाले. हा वर्ल्ड वाइड वेबच्या इतिहासातील महत्त्वाचा टप्पा होता. इंटरनेट कनेक्ट होण्यासाठी संगणक ब्राउजर्स असणे गरजेचे असते. यात माइक्रोसॉफ्ट इंटरनेट एक्सप्लोरर, मोझिला, गुगल क्रोम हे खुप लोकप्रिय ब्राउजर्स आहेत. सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास, ब्राऊजर हा असा एक अ‍ॅप्लिकेशन प्रोग्रॅम की, कॉम्प्युटर अथवा मोबाईलवर हवी असलेली माहिती वर्ल्ड वाईड वेबद्वारे (www) उपलब्ध करून देतो.



माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat




@@AUTHORINFO_V1@@