भारतीय विमानांना मिळणार सुरक्षाकवच

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Mar-2019
Total Views |


नवी दिल्ली
: सीमाभागात पाकिस्तानकडून केल्या जाणाऱ्या कुरापतींच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे. चीन आणि भारताच्या सीमेवर उभ्या असलेल्या वायुदलाच्या विमानांच्या सुरक्षेसाठी एकूण ११० मजबूत शेल्टर बसवण्यात येणार आहे. केंद्राने भारतीय वायूदलाच्या सुरक्षेसाठी हे पाऊल उचलले आहे.

केंद्र सरकारकडून ११० मजबूत शेल्टरच्या निर्मितीसाठी मंजूरी दिल्याची माहिती सुत्रांनी दिली. ब्लास्ट पेन्स नावे ओळखल्या जाणाऱ्या या शेल्टरवर शत्रुच्या विमानांनी केलेल्या बॉम्ब हल्ल्याचा कोणताही परिणाम होणार नाही. पाकिस्तान व चीन सीमाभागातून हल्ला झाल्यास भारतीय वायुदलाच्या विमानांना संपूर्ण सुरक्षा मिळणार आहे.




 



प्रकल्पासाठी ५ हजार कोटींचा निधी

केंद्र सरकारने या प्रकल्पासाठी पाच हजार कोटींचा निधी मंजूर केला आहे. यानंतर ब्लास्ट पेन्सची निर्मिती सीमाभागात केली जाणार आहे. भारतीय वायुदलाकडून अतिसंवेदनशील ठिकाणांवर ही शेल्टर उभारली जाणार आहे. सुखोईसारख्या विमानांच्या सुरक्षेसाठी याचा वापर केला जाणार आहे. त्यामुळे अतिसंवेदनशील भागात विमाने उभी केल्यास शत्रूकडून कोणताही धोका राहणार नाही.



एअर स्ट्राईकनंतर पाक वायुदलाने केला होता हल्ला

ब्लास्ट पेन्सच्या सुविधेमुळे पाकिस्तानी सीमेलगत विमाने तैनात करण्यास वायुदलाला शक्य होणार आहे. दरम्यान एअर स्ट्राईकनंतर भारतीय वायुदलाच्या विमानांवर पाकिस्तानी वायुसेनेने हल्ला केला होता.



१९६५ मध्ये झाले होते भारताला नुकसान


१९६५ साली झालेल्या भारत-पाक युद्धात भारताला मोठे नुकसान झाले होते. भारतीय वायुसेनेची लढाऊ विमाने यावेळी खुल्या मैदानात उभी होती. त्यावेळपासून भारतीय वायुदल ब्लास्ट पेनची निर्मिती करते. मोठ्या कॉंक्रिट भींतींपासून बनलेले शेल्टर शत्रुच्या हल्ल्यापासून होणारे नुकसान टाळू शकतात.

 


माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@