युतीची शक्यता नाहीच; बारामतीत कमळ फुलणार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Feb-2019
Total Views |



पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आज पुणे दौऱ्यावर आहेत. शाह व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित शक्तीकेंद्र प्रमुख संमेलन पार पडले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युतीची शक्यता फेटाळली असून लोकसभेच्या सर्व जागा लढविण्याचे संकेत दिले आहेत.

 

यावेळी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत आम्ही पूर्ण ४८ जागा लढत आहोत आणि या सर्व जागा आम्ही पूर्ण ताकतीने लढणार असल्याचे सांगितले. तसेच २०१४च्या लोकसभेत आम्ही ४२ जागा जिंकल्या होत्या. २०१९च्या लोकसभेत आम्ही ४३ जागा जिंकू आणि ही ४३वी जागा बारामती असणार असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

 

मागील निवडणुकीत बारामती लोकसभा कमळ चिन्ह नसल्याने थोड्या मताने हुकली. मात्र यंदा तसे होणार नाही. यंदाच्या निवडणुकीत बारामती सोबत शिरुर आणि मावळ मधील जागा भाजप जिंकणार असल्याचे फडणवीस म्हणाले. यावेळी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे, पुणे शहराचे खासदार अनिल शिरोळे, शहर अध्यक्ष योगेश गोगावले तसेच आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.

 

दरम्यान, पुण्यातील गणेश कला क्रिडा रंगमंच येथे पार पडलेल्या मेळाव्यात पुणे, शिरूर, बारामती लोकसभा मतदारसंघांतील बुथ प्रमुख व शक्तीकेंद्र प्रमुखांना अमित शाह व फडणवीस यांनी मार्गदर्शन केले. याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात या कार्यक्रमाच्या मराठी पुस्तकाच्या दुसऱ्या भागाचे प्रकाशन करण्यात आले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@