बीड गर्भपात : डॉक्टर दाम्पत्य १० वर्षे तुरुंगात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Feb-2019
Total Views |


बीड : परळी येथील बेकायदा गर्भपात व स्त्रीभ्रूण हत्या प्रकरणी आरोपींना बीड न्यायालयाने दोषी करार दिला आहे. या प्रकरणी न्यायालयाने डॉक्टर दाम्पत्य आणि मृत महिलेच्या पतीला १० वर्षांची शिक्षा सुनावली. मे २०१२ मध्ये परळीतील सुदाम मुंडेच्या रुग्णालयात विजयमाला पटेकर या महिलेचा गर्भपातवेळी मृत्यू झाला होता.


परळीतील बेकायदेशीर गर्भपातावेळी महिलेच्या मृत्यू प्रकरणाचा निकाल शुक्रवारी लागला. मे २०१२ साली ही घटना घडली असून या प्रकरणी बेकायदा गर्भपात करणाऱ्या मुंडे डॉक्टर दाम्पत्यावर गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात एकूण १७ आरोपी होते. त्यातील जळगावच्या डॉ. राहुल कोल्हे यांचे अपघाती निधन झाले. इतर दोघांचाही दरम्यानच्या काळात मृत्यू झाला होता. या प्रकरणी उर्वरित ११ जणांना न्यायालयाने दोषमुक्त केले.

 

या प्रकरणी मृत महिलेच्या पतीसह डॉक्टर दाम्पत्याला न्यायालयाने १० वर्षांची शिक्षा सुनावली. सध्या मृत महिलेचा पती आरोपी महादेव पाटकर हा फरार असल्याची माहिती आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एस. गांधी यांनी या खटल्याची सुनावणी केली.

 

महिलेचे शवविच्छेदन करणारे डॉ. पी. आय. गाडेकर तसेच सरकारी पंचाची साक्ष महत्त्वाची ठरली असून सरकारी पक्षाकडून युक्तिवाद करणाऱ्या अॅड. मिलिंद वाघीरकर यांनी आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा द्यावी, अशी मागणी केली. यानुसार न्यायालयाने आरोपी सुदाम मुंडे, सरस्वती मुंडे तसेच फरार आरोपी महादेव पटेकर या तिघांना १० वर्षांची शिक्षा व ५० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@